Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
कॅम्प घेऊन गरजूंना निराधार योजनांचा लाभ द्या..! जितेंद्र ढोले यांची निवेदनाद्वारे मागणी..!
कॅम्प घेऊन गरजूंना निराधार योजनांचा लाभ द्या..! जितेंद्र ढोले यांची निवेदनाद्वारे मागणी..!
धडगाव प्रतिनिधी:शासनाच्या इंदिरा गांधी.वृद्धापकाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना,इंदिरा गांधी अपंग निवृत्तीवेतन योजना,श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना इ.योजनांचा अक्राणी तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटात (तोरणमाळ,घाटली,राजबर्डी,असली, मांडवी,कात्री,रोषमाळ खु!) इ.ठिकाणी प्रत्येकी एक एक कॅम्प व धडगाव शहरात एक कॅम्प आयोजित करून व दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव समाविष्ट नसलेल्या गरजू लाभार्थ्यांना स्थानिक तलाठी पंचनामा करून निराधार योजनांचा लाभ द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य युवा परिषदेचे तालुका समन्वयक जितेंद्र दिलीप ढोले यांनी अक्राणी तालुक्यातील तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाची दखल घेत लवकरात लवकर निराधार योजनेच्या कॅम्पची तारीख निश्चित करू व कॅम्प आयोजित करून गरजू लाभार्थ्यांना लाभ देऊ
(ज्ञानेश्वर सपकाळे-अक्राणी तालुका तहसिलदार)
अक्राणी तालुक्यात बहुतांश गरजू लाभार्थी निराधार योजनेपासून वंचित आहेत हीच बाब लक्षात घेता अक्राणी तालुक्यातील तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे ह्यांना निवेदन देण्यात आले आहे.तालुक्यात लवकरात लवकर कॅम्प आयोजित करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यानिही पुढाकार घेऊन जनतेस सहकार्य करायचं आहे.
(जितेंद्र दिलीप ढोले-महा-राज्य युवा परिषद तालुका अक्राणी समनव्ययक)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा