Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड, नव्य दिशा संस्था व महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नगरपालिका हॉलमध्ये आशा वर्कर यांच्यासाठी covid-19 जनजागृती कार्यक्रम संपन्न
क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड, नव्य दिशा संस्था व महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नगरपालिका हॉलमध्ये आशा वर्कर यांच्यासाठी covid-19 जनजागृती कार्यक्रम संपन्न
धुळे प्रतिनिधी: क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड, नव्य दिशा संस्था व महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नगरपालिका हॉलमध्ये आशा वर्कर यांच्यासाठी covid-19 जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
त्यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व आशा वर्कर यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
लॉक डाऊन च्या काळात घराघरात जाऊन लोकांची सेवा करणाऱ्या आशा वर्कर यांना त्यांच्या ज्ञानात भर व्हावी म्हणून नव्य दिशा संस्थेमार्फत तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
Covid-19 ची निर्मिती कशी झाली वायरस कसा पसरला व त्यांच्या साठी सामान्य जनता आशा वर्कर त्यांनी काय काय विशेष काळजी घेतली पाहिजे या विषयी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले सोबत रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी लहान मुलं व गरोदर माता यांची काळजी कशी घ्यावी याविषयी देखील डॉक्टर कौस्तुभ साळुंखे डॉक्टर सुजाता साळुंखे डॉक्टर प्रिया मासाने मॅडम यांच्याकडून सफल मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात धुळे शहरातील किमान शंभर अशा वर्कर यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सोबत त्यांना क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड व नव्या दिशा संस्था यांच्यामार्फत मोफत व मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
मनपा सभापती सुनील बैसाने, मनपा उपायुक्त s.r. गोसावी. मनपा मेडिकल ऑफिसर महेश मोरे, सिविल हॉस्पिटल वैद्यकीय अधीक्षक डॉ अश्विनी भामरे ,CAGL झोनल ऑफिसर श्रीनिवास रेड्डी, आशा वर्कर प्रोग्रम मनेजर डॉक्टर प्रशांत साळुंके, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर कौस्तुभ साळुंके, डॉक्टर प्रिया मसाने, डॉ.सुजाता साळुंखे एरिया मॅनेजर शांताराम बारडोले उपस्थीत होते. सूत्रसंचालन भूषण ब्राम्हणे, प्रास्ताविक रोहीत नंदाने, आभार मोहसीन कटंनली यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा