Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री.विवेकसिंग विठ्ठल रजपूत यांना राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकागौरव पुरस्कार 2020 जाहीर करण्यात आला....!



      
सांगली प्रतिनिधी:मौजे अकिवाट ता. शिरोळ गावचे सुपुत्र शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. विवेकसिंग विठ्ठल रजपूत यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय गुनिजन गौरव समितीच्या शिफारसीनुसार, महाराष्ट्रातील राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व, सक्रिय युवानेतृत्व म्हणून राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकागौरव पुरस्कार २०२० जाहीर करण्यात आला. 
     
उच्चशिक्षित रजपूत यांनी शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून कार्यभार उत्कृष्ठरीत्या सांभाळला होता. त्यांनी २०१९ च्या महापुरात विशेष कार्य केले होते, त्यांच्या या कार्याची माहिती न्युज-इंडिया 24  चॅनलवर दाखविली गेली होती. विशेष म्हणजे शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे तत्कालीन अध्यक्ष व इतर ज्येष्ठ पदाधिकारी यांनी विवेकसिंग रजपूत यांच्या कार्याची विशेष दखल घेत कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली होती व कौतुक देखील केले होते. 
       
त्यानंतर त्यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून अल्पसंख्यांक समाजातील वाहतूकदारांना एकत्र आणून त्यांनी शिव वाहतूक सेनेचे काम वाढविले. 2020 मध्ये कोरोणा काळात त्यांनी सर्व समाजातील वाहतूकदारांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे वाटप त्यांनी केले. कोरोणा काळात इचलकरंजी येथील अपघातग्रस्त तरुणास त्यांनी केलेली विशेष मदत याची नोंद इचलकरंजी सहित कोल्हापूर जिल्ह्याच्या युवा पिढीने घेतली. सर्व समाजातील तरुण पिढीला एकत्र आणून नवी दिशा देणारे युथ आयडॉल अशी त्यांची ओळख तरुणांमध्ये निर्माण झाली आहे. 

त्यांनी लोकस्वराज्य सेवाभावी संस्था स्थापन करून सर्व समाजातील होतकरू तरुण पिढीसाठी रोजगार निर्माण करण्याची संधी करून दिली आहे. मंत्रालयातून संपर्काद्वारे निराधार महिलांना पेंशन योजना मंजूर करण्याचे विशेष काम त्यांनी सुरू केले आहे. आपला हक्काचा माणूस विवेकसिंग रजपूत अशी त्यांची ओळख तरुणांमध्ये निर्माण झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध