Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

कै जतिरामजी बर्वेसाहेब...! समस्त मच्छिमार समाजातील एक आदरणीय व्यक्तीमत्व...!



मुंबई प्रतिनिधी: कै जतिरामजी बर्वे साहेबांचा जन्म हा पोटासाठी भटकंती करणा-या जमातीत अर्थात मच्छिमारीचे कार्य करणा-या भोई, कहार, ढिवर, केवट... या व त्यांच्या तत्सम जमाती समाज घटकात २१-०४-१९१९ रोजी रामटेक गांवी झाला. बर्वेजींचे कुटुंब अनेक काबाड कष्ट करुन आपले जीवन जगत होते अशावेळी स्वातंत्र्याचे वारे सर्वदूर पसरले होते. इंग्रज सत्ते विरुद्ध चले जावचा लढा उभा राहिला होता.

आपण ही भारत मातेचे सुपुत्र आहोत आणि आपण ही भारत मातेसाठी काही तरी करावे असे त्यांना सतत वाटत होते म्हणून त्यांनी १९४२च्या चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला. इंग्रज सरकार विरुद्ध बंड ही केले आणि त्यातून त्यांना २२वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. ४ वर्ष शिक्षा भोगत असतांना स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीत सहभागी झालेल्या सहकार्यांकडून त्यांची दखल घेतली गेली आणि १९४२ मध्ये त्यांना त्यातून मुक्त केले गेले. समाज सेवा करतांना त्यांनी राजकारणात ही सहभाग घेतला होता.

१०वर्षे ते रामटेक काँग्रेस कमिटीचे काहीकाळ सचिव तर काहीकाळ उपाध्यक्ष ही राहिले. १९५१ ते १९५७ पर्यंत ते रामटेक काँग्रेस कमीटेचे अध्यक्ष होते. १९६७ते ७१ जिल्हा काँग्रेस कमीटेचे कोषाध्यक्ष, १९७१ते १९७७ जिल्हा काँग्रेस कमीटेचे अध्यक्ष होते. त्यांच्या सामाजिक त़था राजकीय कामाचा परिपाक पाहता अनेक बाबी आपल्या समोर येतात. १९५२ पासुन ते रामटेक नगर परिषदेचे अध्यक्ष होते, १९६२-६७ मध्ये त्यांनी पंचायत समितीचे सदस्य म्हणून ही काम केले, १९६७-७२ पर्यंत जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले, १९७२-७७ मध्ये विधान परिषदेचे आमदार म्हणून ही त्यांनी काम केले, १९७८-७९ मध्ये खासदार म्हणून ही ते लोकसभे मध्ये गेले, १९८० मध्ये पुन्हा निवडून येऊन सर्वात जास्त मतांनी निवडून गेलेले लोकसभा उमेदवार म्हणून त्यांची गणना भारत देशात होते. १९८४ पासुन ते शेवट पर्यंत पंजाबराव कृषी विद्यापीठावर कोर्ट मेंबर म्हणूनही त्यांनी काम केले. शिक्षण क्षेत्रात ही त्यांनी भरिव कार्य केले आहे.

समर्थ शिक्षण मंडळ, विकास हायस्कूल कन्हान, नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालय रामटेक या शिक्षण संस्था मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मत्स्य क्षेत्रात ही त्यांनी खुप मोलाची कामगिरी केली आहे. भटक्या विमुक्तांच्या विकास कार्यासाठी १९७३ला नागपूर राज्यातील समस्त मच्छिमार समाज घटकासाठी फार मोठा मेळावा झाला. राज्यस्तरावर भोई, कहार, ढिवर आणि त्यांच्या संपुर्ण उपजाती यांच्या समाजआरक्षण हक्कासाठी जे प्रयत्न झाले त्यात त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक, मुंबईचे महापौर बाबासाहेब वरळीकर, पुण्याचे महापौर बबनरावजी परदेशी, मंत्री नरेंद्र तिडके उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील समस्त भटके मच्छिमार विमुक्तांचा सामाजिक विकास व्हावा म्हणून त्यांच्या सामाजिक आरक्षणाची मांग करण्यात आली तीच मांग पुन्हा पुणे विभागातील बैठकीत करण्यात आली.

आमचे जळगावचे गुरुजी मा श्री एसए भोईसर अंतुर्ली-जळगांवकर यांच्या वरही त्यातील काही सामाजिक कामगिरी ही सोपविण्यात आली होती आणि मे १९७४ मध्ये राज्यातील भटके मच्छिमार भोई, कहार, ढिवर, केवट... यांच्या संपूर्ण तत्सम जमाती घटकाला एनटीबी मध्ये समाविष्ट करण्यात आले आणि आजही आम्ही सरकार दरबाच्या पातळीवर एनटीबी मध्ये २५व्या क्रमांकावर भोई व त्याच्या तत्सम जमाती म्हणूनच नोंदणीत समाविष्ट आहोत परंतु दु:खाने लेखन करावेसे वाटते की, महाराष्ट्रातील आमच्या तत्सम जमातीघटक ह्या अजूनही आपल्या हक्कासाठी म्हणाव्या तितक्या एकीच्या मार्गावर एकञ येतांना दिसत नाहीत. अनेकांनी आपली दारे अनेक दिशांना गटातटाच्या माध्यमातून उभी करुन ठेवलेली दिसत आहेत त्यामुळे आमच्या मध्ये म्हणावा तितका एकोपा अजूनही महाराष्ट्र राज्यातील पातळीवर दिसत नाही त्याचा परिणाम हा आमच्यावर महाराष्ट्र राज्यात सातत्याने होतांना दिसतो आहे तो म्हणजे आमच्या समस्त जमाती वर कोठे ना कोठे हल्ले होतांना दिसत आहेत, कोणी आम्हाला फासावर लटकवत आहे, आमच्या वर अन्याय झाला तर आमच्या अन्यायाची नोंदही काही ठिकाणी घेतली जात नाही असे तरी काही उदाहरणा वरुन दिसत आहे.काही वेळा त्यासाठी आम्हाला उपोषणालाही बसावे लागते तर कोठे इतर जातींचा, राजकारण्याचा दबाव आला असता तो आम्हाला निमूटपणे सहनही करावा लागतो आहे.

आमच्या समस्त कुटुंबातील सदस्यांना वेठीस धरत असतांना काही ठिकाणी फक्त आणि फक्त बघ्यांची भुमिका ही काहींची दिसते आहे अशा वेळी आम्ही राज्यातून संघटीत नसल्याचेच दिसत आहे तरी यात बदला हा झाला पाहिजे.

कै मा जतिरामजी बर्वे साहेबांना भावपूर्ण अभिवादन करतांना, समस्त जमाती घटकाकडून आम्ही वारंवार एकतेची अपेक्षा व्यक्त करतो आहे. आपण सर्वांनी आपल्या सामाजिक हक्कासाठी गटा तटाची भाषा सोडून आपल्या समस्त समाज बांधवांच्या किंबहुना संपुर्ण समाजाच्या विकासासाठी, हक्कासाठी एकीतून सामाजिक एकोप्याचे कार्य करु या आणि हीच आजच्या दिनी अपेक्षा ही सार्वत्रिकरित्या करु या,त्यासाठी सामाजिक एकीच्या कामाला ही लागू या आणि कै जतिरामजींच्या कार्याला नतमस्तक ही होऊ या..जय जतिरामजी, जय समस्त मच्छिमार, जय भोई तत्सम जमाती समाजघटक, जय महाराष्ट्र.



1 टिप्पणी:

प्रसिद्ध