Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
श्रीराम मंदिर, अयोध्या निधी समर्पण अभियानाच्या पहिल्याच दिवशी आ.गिरीष महाजन यांनी ५,५१,१११ रुपयाच्या देणगीने केला शुभारंभ...!
श्रीराम मंदिर, अयोध्या निधी समर्पण अभियानाच्या पहिल्याच दिवशी आ.गिरीष महाजन यांनी ५,५१,१११ रुपयाच्या देणगीने केला शुभारंभ...!
जामनेर प्रतिनिधी: आज दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालया तर्फे निधी संकलन अभियानास सुरुवात करण्यात आली. अभियानाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारी २०२१ ला निधी संकलनासाठी शहरातील विविध मान्यवर व्यक्तींच्या भेटी गाठी घेण्यात आल्या.या अभियानांतर्गतच आ. गिरीष महाजन यांच्या निवासस्थानी श्रीराम मंदिर, अयोध्या निधी समर्पण अभियानाचे कार्यकर्ते आलेले होते.
त्यावेळेस आ. गिरीष महाजन यांनी ५,०१,१११ /- रुपये ( पाच लाख एक हजार एकशे अकरा रुपये मात्र) तसेच जामनेर नगरीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. साधनाताई गिरीष महाजन यांनी ५१,००० /- रुपयांचा (एकावन्न हजार मात्र) धनादेश तालुका अभियान प्रमुखांकडे दिला.
याप्रसंगी गिरीषभाऊंनी १९९२ च्या कारसेवेच्या आठवणींना उजाळा देत श्रीराम मंदिर, अयोध्या निधी समर्पण अभियानास शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित संघ कार्यवाह निलेश माळी, विहिंप प्रखंड मंत्री प्रवीण सुशीर, सह अभियान प्रमुख गजानन माळी, हिशोब प्रमुख श्याम मुळे, सह हिशोब प्रमुख सदानंद देशपांडे, कार्यालय प्रमुख सुखदेव महाजन, केदारजी ओक, गजानन लोणारी, महाले आप्पा, किशोर झांबरे, गोपाल बुळे, नाना सातवे, कर्ण बारी, आकाश नेमाडे, आशुतोष पाटील, गुंजन लोढा, राहुल माळी व छगन दादा झाल्टे, जालमसिंग राजपूत, दीपक तायडे, सदानंद माळी आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा