Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १७ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य विक्रमगड तालुका यांच्या वतीने एस्टीम प्रा. लि.कंपनीत कामगारांना मिळणा-या वागणुकी संदर्भात निवेदन देण्यात आले.....!
जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य विक्रमगड तालुका यांच्या वतीने एस्टीम प्रा. लि.कंपनीत कामगारांना मिळणा-या वागणुकी संदर्भात निवेदन देण्यात आले.....!
सांगली प्रतिनिधी:जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य विक्रमगड तालुका यांच्या वतीने आज एस्टीम प्रा. लि. कंपनीत कामगारांना मिळणा-या वागणुकी संदर्भात निवेदन देण्यात आले.यावेळी विक्रमगड तालुका अध्यक्ष श्री अमर भानुशाली,
विक्रमगड कार्याध्यक्ष श्री सुरज भानुशाली,विक्रमगड सचिव श्री निवृत्ती निसाळ,संपर्कप्रमुख श्री जयवंत भोईर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून सामान्य कामगारांवर वापरली जाणारी शिवराळ भाषा व कामगारांसोबत गैरवर्तन केल्याच्या विरोधात जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य च्या विक्रमगड तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांकडून कंपनीतील मॅनेजर ला घेराव घालून जाब विचारण्यात आला तसेच कामगारांनी 12 तास काम करून देखील मासिक वेतन फक्त 8000 देण्यात येते म्हणून संबंधित कामगारांच्या मासिक वेतनात वाढ करावी व कामगारांसोबत नैतीकतेने वागावे अशा अनेक समस्यांवर जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य चे विक्रमगड तालुकाध्यक्ष श्री.अमर भानुशाली यांच्याकडून समज देण्यात आली तसेच लेखी स्वरूपात निवेदन सुध्दा देण्यात आले आहे.
संबंधित कंपनीने कामगारांच्या समस्या पुर्ण न केल्यास व कामगारांसोबत होणारे गैरवर्तन त्वरित बंद न केल्यास संबंधित कंपनीवर कायदेशीर कार्यवाही करून कंपनीस टाळे ठोकण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
यावेळी जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य चे विक्रमगड तालुकाध्यक्ष श्री.अमर भानुशाली, विक्रमगड तालुका कार्याध्यक्ष श्री.सुरज भानुशाली सचिव श्री निवृत्ती निसाळ संपर्क प्रमुख श्री जयवंत भोईर व शेकडो पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा