Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने दारुसह 5 लाखाचा मुद्देमाल रात्री पोलिसांनी केला जप्त...!



शिरपूर प्रतिनिधी:सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने दारुसह 5 लाखाचा मुद्देमाल रात्री पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने सदर कारवाई केली आहे.

शिरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र 3 लगत असलेल्या पिंप्री फाट्याजवळ अवैध दारु घेऊन जाणाऱ्या चार चाकी कार पोलिसांनी जप्त केली आहे.थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने हद्दीत दिनांक 14 रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांसह पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या लगत असलेल्या पिंप्री फाट्याजवळ एक चार चाकी वाहनातून अवैध दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्या माहिती वरून सापळा लावला असता जि.जे 05 सिएफ 4470 या चार चाकी वाहनाला थांबवून वाहनाची चौकशी केली असता चारचाकी वाहनात एकूण बॉम्बे व्हिसकी विदेशी दारूचे 50 बॉक्सची अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आले त्याना वाहनासह ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून एकूण 3,12,000/- रुपये किमतीचे दारूचे एकूण ५० बॉक्स तसेच एक चार चाकी वाहन किंमत अंदाजे 1,50,000 /- असा एकूण 4,62,000/- रुपये किमतीचा मुद्देमालासह ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत कायदेशीर कार्यवाही करण्यात येत होती.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक धुळे
चिन्मय पंडित तसेच अपर पोलीस अधीक्षक धुळे प्रशांत बच्छाव तसेच उपविभागीय अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, उपनिरीक्षक नवनाथ रसाळ,सिराज खाटीक ,उन्मेष आंळदे, नरेंद्र पवार, प्रकाश मालाचे,विजय जाधव आदी जणांनी कारवाई केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध