Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

बालाजीनगर येथे 72वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला....!


 
   

सांगली प्रतिनिधीी:दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी बालाजीनगर येथे 72वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर श्री विजय धुळूबुळू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन ध्वजाला राष्ट्रीय सलामी दिली यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिरज येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर श्रीनिवास जी ए यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय धुळूबुळू यांनी स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना सांगितले यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार बालाजी नगर च्या चेअरमन सौ चित्रा पंडियन यांनी केला तसेच बालाजी नगर मधील विकास कामांची माहिती माजी चेअरमन श्री संतोष पाटील यांनी दिली बालाजी नगर मधील विकासकामांचा आढावा घेऊन त्यासाठी सौ चित्रा पंडियन यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यातआला तसेच  व्हाईस चेअरमन बाळासाहेब कोळेकर  यांनी बालाजी नगरच्या विकास कामासाठी  सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान केले.

बालाजीनगर मधील बालकलाकारांनी देशभक्तीपर नृत्य गायन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी बालाजी नगर मधील सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कृत शाहीर बजरंग आंबी यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सर्व उपस्थित सभासदांचे आभार सचिव श्री एके चौगुले यांनी मानले.
तरुण गर्जना प्रतिनिधी
प्रमोद चिनके
सांगली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध