Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

शिवसेना कार्यालय गणेश मार्केट जवळ सांगली कार्यालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.....!



   
सांगली प्रतिनिधी:26 जानेवारी 2021 मंगळवार रोजी शिवसेना कार्यालय गणेश मार्केट जवळ सांगली कार्यालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
     
यावेळी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे सांगली जिल्हा प्रभारी अध्यक्ष माननीय मोहन कवठेकर साहेब यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले .यावेळी मोठ्या उत्साहाने उपस्थित व्यापारी, कामगार, समाजसेवक,व परिसरातील नागरिक, महिला आघाडी सांगली शहराच्या पदाधिकारी यांनी राष्ट्रगीत म्हणून मोठ्या उत्साहाने झेंडावंदन करण्यात आले. यावेळी योग शिक्षक महासंघाचे अध्यक्ष कवठेकर साहेब म्हणाले की खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थान निरोगी बनवायचे असेल तर रोज आपल्या शरीराला योगाची गरज आहे.

त्यांना योग शिक्षण देणे गरजेचे आहे तसेच आपल्या नव्या पिढीला त्यांच्या प्राथमिक शाळेत हायस्कूलमध्ये तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकात व विषयांमध्ये योग योग शिक्षणाचे अभ्यासक्रम असणे अतिशय गरजेचे आहे असा अभ्यासक्रम केंद्र सरकारने व राज्य सरकारने शाळेमध्ये सुरू केल्यास व आपली नवी पिढीनी योगाचे अनुकरण केल्यास व सरकारने अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश केल्यास खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्तान ची युवा पिढी निरोगी होणार आहे असे त्यांनी मत व्यक्त केले. 

तसेच ते पुढे म्हणाले की की सदर चा अभ्यासक्रम शाळेमध्ये व महाविद्यालयांमध्ये समावेश होण्यासाठी शिवसेना सांगली जिल्ह्याने पुढाकार घेऊन योग शिक्षक संघाच्या पाठीशी राहून आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा असे त्यांनी मत व्यक्त केले यावेळी उपस्थित रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळकर, जितेंद्र शहा, प्रकाश लवटे, शिवसेना महिला आघाडी सांगली शहराध्यक्ष मानसी जितेंद्र शहा, श्वेतांबरी ढोबळे, रूपाली यादव, पूनम गायकवाड, प्राजक्ता पवार, स्नेहल शिंदे, आकांक्षा लोहार, अस्मिता कांबळे, जयश्री शहा, कशीश शहा, इत्यादी महिला आघाडी सांगली शहराच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या
तरुण गर्जना प्रतिनिधी
प्रमोद चिनके
सांगली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध