Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २७ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
समता शिक्षक संघटनेच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेतील तृतीय पारेतोषीक प्राप्त शिक्षक ईश्वर महाजन यांचा सन्मान..!
समता शिक्षक संघटनेच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेतील तृतीय पारेतोषीक प्राप्त शिक्षक ईश्वर महाजन यांचा सन्मान..!
अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते .त्या स्पर्धेमध्ये देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल चे उपशिक्षक ईश्वर रामदास महाजन यांनी ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे यावर निबंध लिहिला होता .त्या निबंधाला माध्यमिक गटातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संघटनेच्यावतीने घोषित झाले होते.
त्याचे आज वितरण एरंडोल येथे डी एस पी कॉलेजच्या सभागृहात गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ईश्वर महाजन यांना पारोळा व एरंडोल तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील,प्रताप काँलेजचे माजी प्राचार्य डॉ एल.ए.पाटील, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी विजय पवार, गटशिक्षणाधिकारी अशोकजी बिर्हाडे,
संघटनेचे अध्यक्ष प्रा.भरत शिरसाट व विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या यशाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील,तहसीलदार मिलींदकुमार वाघ,गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन,जळगांव माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष शालीग्राम भिरूड,शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले,महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर,समता शिक्षक संघटनेचे अजय भामरे,मिलिंद निकम,सोपान भवरे,क्रिडा संघटनेचे तालुकाध्यक्ष एस.पी.वाघ,डि.डी.राजपूत, सानेगुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष बागूल सर,व सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक,पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७१,८३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त क...
-
संदीप अवधूत :- दिंडोरी येथील खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी निघालेल्या कुटुंबीयांची मोटार परिसरात असलेल्या शेतातील विहिरीत कोसळल्याने...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा