Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

वरवाडे येथील आर.सी.पटेल शाळेत 72 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा..!

        
शिरपूर प्रतिनिधी:वरवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत 72 वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून वरवाडे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते विट्ठल बोटकू पाटील,अखिल भारतीय माळी महासंघाचे उपाध्यक्ष संतोष महारु माळी होते.तर ध्वजारोहन शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी प्रास्ताविक मुख्याध्यापक गोपाल पाटील यांनी केले तर खैरनार सुनिल आसाराम यांनी सुत्रसंचालन केले.तर राकेश शिरसाठ यांनी आभार प्रदर्शन केले.कोविड 19मुळे विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत व कोविड 19 चे पालन करत प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध