Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

महाराष्ट्रातील जनतेस कोरोना काळातील भरमसाठ वाढिव वीजबिल माफी संदर्भात



शिरपूर प्रतिनिधी:सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच मनसे नेते शिरीष सावंत साहेब यांच्या आदेशानवये राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब कदम,मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंत राजे देशमुख यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा संघटक श्री किरण माळी यांच्या नेतृत्वात आज शिरपूर तालुका पोलिस निरीक्षक यांना महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेस कोरोना काळातील भरमसाठ वाढिव वीजबिल माफी संदर्भात वीजबिल माफी करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाचे वेळोवेळी घुमजाव करत जनतेची दिशाभूल केल्याबद्दल तसेच वीज वितरण कंपनीचे संचालक मंडळ यांच्यावर देखील जनतेस मानसिक क्लेश आर्थिक लुबाडणूक व खोटी आश्वासने देऊन ते न पाळण्याने केलेली फसवणूक या संदर्भात गुन्हा दाखल व्हावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राज साहेबांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. 
                 
यावेळी मनसे धुळे जिल्हा संघटक किरण माळी ,तालुका संघटक  संजय माळी ,तालुका उपाध्यक्ष योगेश पाकडे,प्रल्हाद पाटील,पप्पू माळी,दिपक माळी,निलेश पाटील,रवी बेलदार,अजय महाजन,आकाश कोळी, आदी पदाधिकारी यांनी निवेदन देऊन ऊर्जा मंत्र्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध