Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

विश्व जनआरोग्य सेवा समितीचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न....



पुणे(राहुल शिंदे)दि.27 विश्व जनआरोग्य सेवा समितीचा प्रथम वर्धापन दिन रविवार दि.24 जानेवारी रोजी पुणे येथे राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहामध्ये उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमास निवृत्त सहा. पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे, डॉ. रवींद्र महाजन- कॅन्सर रेडिएशन स्पेशालिस्ट इंलॅक्स बुधराणी हॉस्पिटल, डाॅ.मिलिंद कारंजकर, सायकॉलॉजिस्ट पुणे,डॉ. देशमुख- शासकीय आरोग्य विभाग पुणे, डॉ.काळदाते मनोविकार तज्ञ, श्री.दिनकर कोतकर छावा संघटना इत्यादी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून झाल्यानंतर मान्यवरांचा सत्कार व तज्ञ डॉक्टरांचे चर्चासत्र आयोजित केले होते तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसेवा, व सामाजिक कार्य अविरत  करणाऱ्यांचा समाज गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

 रवींद्र पाटील यांनी समितीने वर्षभर केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला, मार्च पासून कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले परंतु आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांनी नेहमीप्रमाणेच अखंडपणे शक्य ती सेवा रुग्णांना मिळवून दिली,15 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्रात एकाच वेळी 30 ठीकाणी महारक्तदान शिबिरे आयोजित केली. त्याशिवाय एक वर्षाच्या काळात संपुर्ण महाराष्ट्रभर तब्बल 42 रक्तदान शिबीर आयोजित करून गरजू रुग्णांना मोफत रक्त  दिले. समितीने 2021 चे आरोग्य माहीती देणारी दिनदर्शिका कॅलेंडर प्रकाशित केले त्याचे प्रमुख पाहूणे व समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 

समितीच्या व्यासपीठावरून बोलताना संस्थापक अध्यक्षा छाया भगत म्हणाल्या की" सातत्याने आरोग्य क्षेत्रात काम करीत असताना गोरगरिबांना, तळागाळातील व्यक्तीला सहज व मोफत औषधोपचार उपलब्ध व्हावे म्हणून आम्ही आरोग्य सेवा समितीची स्थापना केली. आम्ही केलेल्या चांगल्या कार्याची दखल म्हणून आपण सर्वजणांनी उपस्थिती दर्शवून पाठीवर शाबासकीची थाप दिली‌. भविष्यात अशीच साथ कायम राहू द्या अशी आशा बाळगते व विश्व जन आरोग्य सेवा समितीचे नाव निश्चितच विश्वव्यापीही होईल अशी आशा बाळगते.

कार्यक्रमास समितीचे पदाधिकारी प्रशांत भोसले, अॅड.प्रीती परांजपे,संग्राम जमालपुरे,गोरख जोरी, मंगेश हावाळे,मयूर चव्हाण,बाविस्कर,सोमनाथ कोकाटे,राहूल शिंदे, विद्या जोरी,येरुणकर,अमोल राडे, नितीन वायदंडे आदी रूग्णसेवक महाराष्ट्रातून आले होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले व आभार प्रदर्शन प्रविण महाजन यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध