Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१
अहमदनगर जिल्ह्यात विस हजार कोंबड्यांची विल्हेवाट?
अहमदनगर : अहमदनगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे मरण पावलेल्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मरण पावलेल्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला असल्याचे उघड झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने एक किलोमीटर परिसरातील जवळपास वीस हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावली असल्याचे समजते.
श्रीगोंदा, जामखेड यासह नगर तालुक्यातील काही वन्य पक्षी मृतावस्थेत सापडले होते. श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोंबड्यांना मात्र बर्ड फ्लू झाल्याचे आढळले नव्हते. दरम्यान, चिचोंडी पाटीलमध्ये मरण पावलेल्या कोंबड्याचा अहवाल पॉझिटिव्ह येताच प्रशासन सतर्क झाले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा