Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३ जानेवारी, २०२१

पातोंडा येथे सावित्रीमाई फुले जन्मोत्सव साजरा...!

    
     
                                                        
पातोंडा ता. चाळीसगाव येथे नुकतीच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची एकशे नव्वद वी जयंती मोठ्या उत्साहाने नुकतीच साजरी करण्यांत आली. सदर उत्सवाचे आयोजन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सत्यशोधक विचार मंच शाखा पातोंडा तसेच मुळनिवासी बळीरजा गृप यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात आले होते उपस्थितीत जेष्ठ महिलांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन केले याप्रसंगी समाधान आनंदा महाजन(फौजी ) यांनी सावित्रीमाई फुले यांचे विचार घराघरात पोहोचावेत या करिता दर्शना पवार यांनी लिहिलेले "सावित्रीमाईंचा जन्मउत्सव" हे दोनशे पुस्तकं उपस्थितांना वाढदिवसा निमीत्त भेट दिली. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्षा सतिश महाजन सर प्रमुख पाहुणे पातोंडा येथील लोकनियुक सरपंच सौ. रेखाताई पांडूरंग ( बापू ) माळी, मा.सभापती संजय पाटील, अक्षय पवार मा. सरपंच अनिल शामराव माळी,डाॅ बाळासाहेब पाटील, पोलीस पाटील शरद महाजन, भगवान अहिरे, भरत अहिरे, फरीद पठाण, दिपक मोरे, कैलास मामा, सापडू माळी, नाना माळी, दगडू बापूजी बालू महाजन, कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे तालुकाध्यक्ष कैलास भगवान जाधव, आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत समता परिषदेचे तालुका सचिव गोविंद वाघ, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सत्यशोधक भगवान शा रोकडे तर आभार प्रशांत झगडे यांनी मानले आलेल्या मान्यवरांचे स्वागत शाल टोपी श्रीफळ फुलं न देता महापुरूषांचे पुस्तक भेट देऊन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समता परिषदेचे व सत्यशोधक विचार मंचचे पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध