Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
जामनेर येथे श्रीराममंदीर निधी समर्पण अभियान संपर्क कार्यालयाचा आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ..!
जामनेर येथे श्रीराममंदीर निधी समर्पण अभियान संपर्क कार्यालयाचा आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ..!
जामनेर: प्रतिनिधी श्रीराम मंदिर निधी संकलन साठी जामनेर शहरातुन जनजागृती रॅली काढून बिओटी व्यापारी संकुलात निधी संकलन कार्यालयाचा शुभारंभ माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.
गेल्या बऱ्याच वर्षांपासुनचा लढा,अनेकांनी दिलेले बलीदान,तसेच पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचा ऐतीहासीक निर्णय देणे आणी आपल्या देशासह जगाने तो निर्णय शांततेने स्विकारणे यामुळेच अयोध्येतील बांधले जाणारे श्रीराम मंदीर हे केवळ एक मंदीर न रहाता शांततेचा संदेश देणारे प्रतीक ठरणार असल्याचे प्रतीपादन माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केले.
गेल्या सहा-साडेसहा वर्षांमधे नरेंद्र मोदींच्या सरकारने अनेक लोकहिताचे कायदे करून देश विकास-संपन्न, शक्तीशाली आणी समृध्द होण्यासाठी मार्गक्रमण सुरू आहे,नुकत्याच शेतकरी आणी शेती क्षेत्राला बळकटी आणुन शेतऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी नवीन कायदे केले,मात्र काही विघ्नसंतोषी विरोधक वेगळाच प्रचार करून चांगल्या कायद्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र करीत आहेत असेही गिरीष महाजन यावेळी म्हणाले.
प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदीरा निर्माणामधे सर्व भारतीयांचा सहभाग असावा म्हणुन शहरांसह ग्रामीण भागातुन स्वयंसेवकांद्वारा निधी संकलन अभियान राबविण्यात येणार असल्याचे कर्ण बारी यांनी आपल्या प्रास्तावीकात सांगीतले.
कार्यक्रम उपस्थितांमध्ये जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते फकीराभाई ,श्यामचैतन्य महाराज,डॉ सचिन पाचंगे,अँड शिवाजी सोनार,अमर पाटील,नवलसिंगराजपुत,महेंद्र बावीस्कर,भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, आतीष झाल्टे आदी मान्यवर तसेच मधुकर पंडित,डॉ मनोज विसपुते,
गजानन लोणारी,श्याम मुळे,हेमंत वाणी,गोपाळ बुळे,रविंद्र झाल्टे,मयुर पाटील,ईश्वर चौधरी,नंदु कुमावत,कैलास पालवे,विलास हिवराळे,नाना सातवे,निलेश माळी, शुभम माळी, आकाश नेमाडे,जितू कुमावत,सागर चव्हाण,सुदर्शन वराडे आदी स्वयंसेवक व नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा