Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २३ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बालाजी फैल नजीक खळवाडी भागात शेगाव नगरपालिके कडून २२ जानेवारी रोजी अतिक्रमण हटाव
शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बालाजी फैल नजीक खळवाडी भागात शेगाव नगरपालिके कडून २२ जानेवारी रोजी अतिक्रमण हटाव
शेगाव (प्रतिनिधी)तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बालाजी फैल नजीक खळवाडी भागात शेगाव नगरपालिके कडून २२ जानेवारी रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.शेगाव रेल्वे स्थानक पासून संत श्री गजानन महाराज मंदिर पर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या ५२ मालमत्ता आज शुक्रवरी अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत जमीनदोस्त करण्यात आल्या. दीडशे पोलिसांच्या बंदोबस्तात पार पडलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला नागरिकांच्या प्रचंड विरोधाला पोलिसांना सामना करावा लागला.
यावेळी काही जणांना पोलिसनी ताब्यात घेतले होते.महाराष्ट्र शासनाने इसवी सन २००९ मध्ये हे गावच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला होता. आराखड्याअंतर्गत शेगाव शहरातील बहुतेक रस्त्यांची काम पूर्ण झालेली आहेत. शेगाव रेल्वे स्थानकापसून तर चार मोरी मार्गे श्री संत गजानन महाराज मंदिरा पर्यंत रस्ता राहिला होता. अंतिम टण्यात आता रेल्वे स्थानक ते श्री संत गजानन महाराज मंदिराला जोडणाऱ्या आरडी १४ या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ झाला आहे. यामध्ये या रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या शेगाव येथील बालाजी फैल जवळील खळवाडी परिसरातील ५२ मालमत्तधारकांना शासकीय मदत मंजूर करण्यात आली.
यापैकी ४० मालमत्ताधारकांनी शासकीय मदत स्वीकारली असून १२ मालमत्ताधारकांनी सदर मदत ही अत्यल्प असल्याचे सांगून ती स्वीकारली नाही. दरम्यान २२ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता दीडशे पोलिसांच्या बंदोबस्तात नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने या भागातील मालमत्ता जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली.
दरम्यान या भागातील काही लोकांनी या मोहिमेला विरोध दर्शविला एका महिलेने तर आपल्याला आधी राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावे यानंतरच आमचे घर पाडावे अशी आग्रही मागणी घरल्याने काही वेळ पोलिसांची तारांबळ उडाली.यानंतर पोलिसांनी बळाचा,प्रयोग करीत सदर महिलेला ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला हलवल्यानंतर महिलेचे घर जमीनदोस्त करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा