Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
श्रीराम मंदिर,अयोध्या निधी समर्पण अभियानाचा आज जामनेर शहरात मोटार सायकल रॅली ने शुभारंभ....!
श्रीराम मंदिर,अयोध्या निधी समर्पण अभियानाचा आज जामनेर शहरात मोटार सायकल रॅली ने शुभारंभ....!
जामनेर प्रतिनिधी: आज दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालया तर्फे मोटर सायकल रॅली चे सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले होते. प. पूज्य श्याम चैतन्य महाराजांनी व प. पूज्य शांती चेतन महाराजांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून रॅली ला सुरुवात केली.
रॅलीची सुरुवात श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालय, बी.ओ.टी मार्केट मधून ते वाकी रोड - जळगाव रोड - हिवरखेडा रोड – भुसावळ रोड – जामनेर पुरा – नगार खाना – गांधी चौक – पाचोरा रोड ते अभियान कार्यालयापर्यंत पार पडली. रॅली नंतर अभियान कार्यालयात प. पूज्य श्याम चैतन्य महाराज व प. पूज्य शांती चेतन महाराजांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला.
यावेळी रॅली मध्ये प. पूज्य श्याम चैतन्य महाराज, प. पूज्य शांती चेतन महाराज, संघ कार्यवाह निलेश माळी, विहिंप प्रखंड मंत्री प्रवीण सुशीर, सह अभियान प्रमुख गजानन माळी, हिशोब प्रमुख श्याम मुळे, सह हिशोब प्रमुख सदानंद देशपांडे, कार्यालय प्रमुख सुखदेव महाजन, महाले आप्पा, किशोर झांबरे, गोपाल बुळे, कर्ण बारी, आकाश नेमाडे, सागर चव्हाण, योगेश देशपांडे, राहुल माळी, आशुतोष पाटील, गुंजन लोढा व असंख्य स्वयंसेवकांचा सहभाग होता.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा