Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १९ जानेवारी, २०२१
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो…!
पुणे प्रतिनिधी:पुण्याच्या खेड तालुक्यातील पाळू ग्रामपंचायत निवडणुकीत पती संतोष गुरव विजयी झाल्यानंतर त्यांच्या पत्नी रेणुका गुरव यांनी त्यांना खांद्यावर घेऊन गावातून फेरी मारली तो क्षण….!
हा फोटो एक नंबर आहे पुण्याच्या रेणुका गुरव यांनी आपल्या पतीच्या विजयाचा असा जल्लोष साजरा केला.कित्येक जणांचे हा फोटो पाहताना नक्कीच डोळे भिरभिरले असतील.कित्येकांचे मेंदू हालले असतील.
इतरवेळी बायोकाला जबरदस्तीने निवडणूकीसाठी उभे करून निवडून आणून...स्वतः भाषण लिहून देणारा आणि तिचे सर्व कारभार बघणारा एक समाजवर्ग आहे.तर दुसरीकडे ती समाजात आत्मसन्मानाने जगावी यासाठी प्रयत्न करणारा देखील समाज आहे.पण हा फोटो यातूनही अनोखा आहे.
ही एक क्रांती आहे.जी कितीतरी डोळ्यांना प्रकाशाच्या वाटेकडे ओढते.निवडणुकीत विजयी झालेल्या नवऱ्याला खांद्यावर घेऊन मिरवणारी बायको....ते ही गावातून.क्या बात है! लोकांचा गोड गैरसमज आहे की,शहरातल्या बायका पुढारलेल्या असतात म्हणे.पण हाच फोटो कितीतरी गोष्टी बोलून जातोय.गावातल्या बाईला पण समजतो तो निवडणूकीचा विजय,ते यश,पॅनल,समानता,
लिंगभाव आणि खरा आनंद!!!!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा