Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

विजय गाढे सर यांना महाराष्ट्र समता शिक्षक परिषद मार्फत गुणवंत शिक्षक पुरस्कार..!



रावेर दि.२७ (प्रतिनिधी ) महाराष्ट्र समता शिक्षक परिषद शाखा जळगाव मार्फत दिला जाणारा महात्मा फुले स्मृतिदिन प्रित्यर्थ या वर्षीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार  तालुका रावेर सरस्वती विद्या मंदिर ,रावेर चे शिक्षक विजय मधुकर गाढे सर यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक २७ जानेवारी रोजी एरंडोल येथे आयोजित समारंभात गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
     
विजय गाढे हे काॅस्ट्रॅईब प्राथमिक शिक्षक संघटनेचे रावेर तालुका सचिव व भारतीय बौध्द महासभा रावेर तालुका संघटक अशा विविध पदावरुन, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याने, त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र समता शिक्षक परिषद शाखा जळगाव मार्फत दिला जाणारा जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत.
     
त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे….



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध