Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

राज्यातील महाविद्यालये लवकर सुरू करा.. विद्यापीठ विकास मंचची निवेदनाद्वारे मागणी....!



जामनेर प्रतिनिधी:कोविड१९च्या भीषण कार्य काळापासून राज्यातील कला, वाणिज्य, विज्ञान,विधी ,शिक्षणशास्त्र असे सर्वच महाविद्यालय कोविड १९ प्रादुर्भाव असल्या पासून बंदच आहेत .शासन आदेशानुसार ऑनलाइन अभ्यासक्रम करण्याचे निर्देश होते. त्यानुसार परिक्षांचे आयोजन करण्यात येत आहे. ऑनलाइन अभ्यासक्रम संदर्भात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

ऑनलाइन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना ज्ञान घेण्यात अडचणी येत आहे .त्यामुळे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित आहे .अशा तक्रारी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या येत आहे.विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आज(२५)रोजी जामनेरात विद्यापीठ विकास मंचच्या आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राज्यातील महाविद्यालये लवकर सुरू करणे बाबत तहसीलदार अरुण शेवाळे, जामनेर महाविद्यालयाचे प्राचार्य शिरीष पाटील, आय एम आर कॉलेजचे प्राचार्य किशोर पाटील, सुरेश दादा जैन फार्मसी कॉलेजचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले.
       
राज्यातील नववी ते बारावी पर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्यात आलेले आहे व आता कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झालेला नाही . देशाची प्रगती व विकास उच्च शिक्षणावर अवलंबून आहे .उच्च शिक्षण व्यवस्था कायम ठेवायची असेल तर प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू होणे गरजेचे आहे. महाविद्यालयाच्या प्रत्यक्ष सुरू न झाल्यास शैक्षणिक कामकाजाचा चालना मिळेल .विचारांची देवाणघेवाण होईल. प्राध्यापक विद्यार्थी समन्वय घडून येईल परिपूर्ण विद्यार्थी घडेल. सद्यस्थितीने कोविड१९ परिपूर्ण नियंत्रणात असून लसीकरण प्रक्रिया सुरू झालेली आहे .महाविद्यालयात विद्यार्थी प्राध्यापक शासन नियमांचे पालन करतील व नियमित शिक्षण घेतील. एकंदरीत विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यापीठ विकास मंचच्या वतीने निवेदन द्वारे करण्यात आले. महाविद्यालये लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अन्यथा मागणी मान्य न झाल्यास विद्यापीठ विकास  मंचाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.  
       
यावेळी  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील , राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य व विद्यापीठ विकास मंच जिल्हा प्रमुख नितीन झाल्टे,विद्यापीठ विकास मंच तालुका प्रमुख अमोल महाजन अभाविपचे मनोज जंजाळ ,कल्पेश सोनवणे,पवन बाविस्कर,रवींद्र झाल्टे,कैलास पालवे ,संजय सूर्यवंशी,आकाश नेमाडे,मनिष सैतवाल विनायक पाटील,विजय शिंदे,रोशनी गोयर आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध