Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

प्रजासत्ताक दिनी पत्रकार मोहन सारस्वत यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान....!



जामनेर प्रतिनिधी :जळगाव जिल्हाधीकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जळगांव जिल्हा शाखा यांचेकडुन कोरोना योध्दा सन्मान २०२१ ने प्रजासत्ताक दिनी  लोकमतचे संपादक मा. मिलींददादा कुलकर्णी यांचे हस्ते व पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील व माजी मंत्री आमदार मा. गिरीश महाजन यांचे हस्ते सन्मान ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. 

सारस्वत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की खरे तर पत्रकारीतेच्या माध्यमातुन शक्य तितकी समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करीत असतांना मिळणारा सन्मान मनोबल वाढविणारा ठरतो व जोमाने काम करण्यासाठी नवी उर्जा देतो.संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष,संपर्क प्रमुख  जिल्हा ग्रामीण अध्यक्ष व सर्व पदाधीकारी यांचे सन्मानित केल्याबद्दल आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध