Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १९ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
गुगळाई देवी अँग्रो प्रोड्यूसर कंपनी यांच्या वतीने शेतकऱ्यांना व महिला बचत गटांना मार्गदर्शन...
गुगळाई देवी अँग्रो प्रोड्यूसर कंपनी यांच्या वतीने शेतकऱ्यांना व महिला बचत गटांना मार्गदर्शन...
परंडा (राहुल शिंदे) दि.19 तालुक्यातील चिंचपूर (बु) येथील नाबार्ड बॅंकेच्या अर्थ सहाय्याने स्थापन झालेल्या गुगळाई देवी अँग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड यांच्या वतीने,आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छते बाबत नागरिकांनी कोणत्या प्रकारची व कशा प्रकारे काळजी घ्यावी, महिला बचत गटासाठी शेतीपूरक व्यवसाय कोणते ? व कशा प्रकारे करावे? या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.प्रथम कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाबार्ड बॅंक उस्मानाबादचे विनायक कोठारी साहेब,उस्मानाबाद जिल्हा बॅंकव्यवस्थापक विजयकर सर, निसर्ग सेवा भावी संस्था अंबाजोगाईचे वाघमारे सर व त्यांची संपूर्ण टीम,रयज सर, भास्कर जाधव,सिद्धार्थ सावंत यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन गुगळाई देवी अँग्रो प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन दत्तात्रय अंकुश मल्हारे यांनी केले होते.तानाजी देवकर, दत्तात्रय घिगे,सौ.सोनाली दत्तात्रय मल्हारे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील कंपनीचे सर्व सभासद व शेतकरी तसेच महिला बचत गटातील महिला उपस्थितीत होत्या.कार्यक्रमांची सांगता स्वच्छते बाबतची सामूहिक शपथ घेऊन झाली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा