Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

जामनेर तालुक्यातील ९०% ग्रामपंचायती मध्ये भाजपाचेच वर्चस्व -माजी मंत्री आमदार गिरीश महाजन..!



जामनेर प्रतिनिधी:तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी झालेले असून त्यामध्ये संपूर्ण तालुक्यात ९०% ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व असल्याचा दावा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. तालुक्यात ऐकून ७३ ग्रामपंचायत पैकी ऐका ग्रामपंचायतीने पूर्णतः बहिष्कार केला होता. 

राहिलेल्या ७२ ग्रामपंचायतींपैकी भाजपाने ५८ ग्रामपंचायतीवर आपलेच उमेदवार निवडून आल्याचे सांगून राहिलेल्या १४ ग्रामपंचायती पैकी अजून आमच्या काही ग्रामपंचायती होऊ शकतात असे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी बोलताना सांगितले.सदर ग्रामपंचायतीमध्ये एकूण उमेदवार ६९४ असून त्यापैकी ४८८ या भाजपाच्या आहे व राहिलेले २०६ उमेदवार हे महाविकास आघाडी व अपक्ष मिळून आहे.असेही बावस्कर म्हणाले. परंतु यापैकी ही बरेच उमेदवार भाजपात येणार आहे.

भाजपाप्रणीत सर्व उमेदवार हे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी येऊन सर्व उमेदवारांचे आमदार गिरीश महाजन यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले. यावेळी तालुका अध्यक्ष श्री चंद्रकांत बाविस्कर उपनगराध्यक्ष शरद पाटील सर ,जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, एडवोकेट शिवाजी नाना सोनार,छगन झाल्टे,श्रीराम महाजन,संतोष बारी, दीपक तायडे ,अनिश शेख,बाबूराव हिवराळे,नवलसिंग राजपूत,सुहास पाटील ,अतिश झाल्टे, रवींद्र झाल्टे, सुभाष पवार,सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध