Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

जेकटेवाडी ग्रामपंचायत सहा उमेदवार बिनविरोध तर, एका जागेसाठी तुकाराम खामकर विजयी...



परंडा (राहुल शिंदे) दि.19 तालुक्यातील जेकटेवाडी येथील एकाच जागेसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री.तुकाराम सुग्रीव खामकर हे 21मतांनी विजयी झालेले आहेत तर, प्रतिस्पर्धी उमेदवार श्री.निलेश तात्याबा केसकर यांचा पराभव केला आहे.या निवडणूक प्रक्रियेत 337लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता, विशेष बाब म्हणजे सहा सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत तर फक्त एका जागेसाठी मतदान झाले होते.

1) सौ.चंद्रकला तानाजी रोमन
2) सौ.सुनिता धर्मा तांबे
3) सौ.सुनिता हंबेराव लांडे
4) सौ.संध्याराणी गणेश जेकटे
5) श्री.दगडू भीवा खामकर
6) श्री.नारायण दूधवडे 
7) श्री.तुकाराम सुग्रीव खामकर 

सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा ! ! !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध