Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१
शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत १२ एकर उसाची राखरांगोळी..!तोंडाशी आलेला घास जळून खाक..!
शिरपूर तालुक्यातील कुरखळी शिवारातील एकूण क्षेत्र १२ एकर ऊस शॉटसर्किट मुळे जळून खाक झाल्याची घटना दि. २९ जानेवारी रोजी दुपारी १. ३० ते २ च्या सुमारास घडली.
तालुक्यातील कुरखळी शिवारात श्री. अनिल मोरे, गणपत मोरे, सुभाष मोरे, थॉमस राजपूत सर्व रा. कुरखळी यांच्या मालकीची एकूण १२ एकर शेती आहे. दि. २९ रोजी दु. १. ३० वाजेच्या सुमारास शेताच्या बांधावर असलेल्या डी. पी. वरून गेलेले तार एकमेकांना जुळल्यामुळे ठिणगी शेतात पडून शॉटसर्किट होऊन अचानक आग लागली. हवेमुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते.
शेतात आग लागल्याचे समजताच कुरखळी गावातून युवक व शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शेताकडे धाव घेतली. कुरखळीतील शेतकऱ्याच्या समय सूचकतेमुळे व जवळच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या तत्परतेमुळे आग विझविण्यास मोठी मदत झाली.
या आगीत अंदाजे ४०० टन ऊस सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. या आग बाधित शेताच्या आजूबाजूला अंदाजे २० एकर ऊस हा तोडणीला आलेला होता. शेतकऱ्यांच्या ध्येर्यामुळे पुढच्या शेतात लागणाऱ्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी रोटा मारून, कुरखळी व सावळदे गावातील युवक व शेतकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यास मदत झाली.
या अग्निउपद्रवाच्या घटनेची सूचना तलाठी व वीज वितरण कंपनीच्या उंटावद कार्यालयाला दिली असता वायरमन श्री. रज्जाक शेख हे घटनास्थळी पोहचून घटनेचा आढावा घेत आहेत. यावेळी तलाठी हेदेखील घटनास्थळी पोहचून स्थळ पंचनामा करून नुकसानग्रस्त क्षेत्राचे अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. व वीज वितरण कंपनीला सादर करण्यासाठी दस्तावेजांची पूर्तता करून दिली.
शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे निघूनगेल्यामुळे शेतकरी संतप्त झालेले आहेत. व दस्तावेजांच्या पूर्ततेसाठीची धावपड करून देखील मदतीची आशा दिसत नाहीये.याघटनास्थळी कुरखळी व सावळदे गावातील तरुण, स्थानिक शेतकरी वायरमन श्री. रज्जाक शेख, पोलीस पाटील, यांच्या सह ऊस तोडणी मजूर उपस्थित होते.
योगेश्वर मोरे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे आदेशान्वये कारवाई करण्य...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा