Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ जानेवारी, २०२१

वैकुंठवासी पुरुषोत्तम पाटील नगर स्वागत कमान चे लोकार्पण...!



शेगाव प्रतिनिधी( उमेश राजगुरे) स्थानिक नगर परिषद प्रशासनाच्या वतीने स्वागत कमान उद्घाटन व लोकार्पण सोहळा रविवारी 3 जानेवारी रोजी सकाळी पार पडला या प्रसंगी उद्घाटक म्हणून ह.भ.प तुकाराम महाराज इलोरा मुख्य अतिथी म्हणून जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या धर्मपत्नी सौ अपर्णा ताई कुटे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शकुंतला ताई  बूच विशेष उपस्थिती मध्ये माऊली ग्रुप चे अध्यक्ष ज्ञानेश्वर दादा पुरुषोत्तम पाटील , उपाध्यक्ष ज्योती कलोरे, भाजप गटनेते तथा माजी नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल ,तसेच प्रभागाचे नगरसेवक  प्रफुल ठाकरे,दिनेश शिंदे नगरसेविका सौ अलका खांनझोडे, बांधकाम सभापती सौ रत्नमाला बाई ठवे, मुख्याधिकारी डॉ प्रशांत शेळके, यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर फीत  कापून उद्घाटन करण्यात आले .

उद्घाटन प्रसंगी प्रवेश द्वार स्वागत कमानीला निष्ठावंत व सच्चे वारकरी वै .पुरुषोत्तम हरिगणेश पाटील यांचे देण्यात आलेले नाव सार्थ ठरल्याचे मत ह.भ.प. तुकाराम महाराज इलोरा यांनी उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले तसेच सर्व जाती धर्म पंथ व जनसामान्यांना वारकरी विचारसरणी नुसारच सोबत घेऊन चालल याबरोबरच सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय धार्मिक कार्यात तत्पर असणाऱ्या गणेश कुटुंबाचे कौतुक करत सामाजिक सलोखा व शांतता सोबतचा नांदावी यासाठी स्थानिकांना आशीर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध