Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

पराभूत उमेदवारांने केला विजयी उमेदवारांचा सत्कार...



परंडा (राहुल शिंदे )दि.19 तालुक्यातील चिंचपूर (बु)येथील जनशक्ती परिवर्तन पॅनलचे  पराभूत उमेदवार सतिश तळेकर यांनी जनतेने मतदानातून दिलेला कौल मान्य करून, काल लागलेल्या ग्रामपंचायतच्या निकालात विजयी झालेल्या उमेदवारांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार  केला. सतिश तळेकर यांचा आदर्श चिंचपूर (बु) व इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे असे मत नागरीक व्यक्त करत आहेत. तालुक्यातील एकमेव गाव असेल कि निकाल लागल्या नंतर लोक एकमेकांच्या कुर घोडी करण्याचा प्रयत्न करतात ऐकमेकात वाद करून घेतात पण गावातील पराभूत लोकांनी गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि मनाचा मोठेपणा दाखवत नवीन निवडून आलेल्या लोकांचा सत्कार स्वखर्चातून केला हा विषय इतर गावांना प्रेरणादायी आहे.
गावाचा विकास करण्यासाठी गावातील निवडणूक झाली की सर्व नागरिकांनी गावचा  विकास साध्य करण्यासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे, गावच्या पाण्याचा प्रश्न असेल, शाळेचा प्रश्न असेल, रस्ताच्या असेल हे सगळे गावातील सामाजिक प्रश्न एकत्रितपणे सोडून सहकार्य केले तर गावचा विकास कोणीही रोखवू शकत नाही.पन एकही माणूस आडवा आला तर विकास होत नाही असे ते नूतन सदस्याचा सत्कार समारंभ झाल्यानंतर बोलत होते.

वार्ड क्रमांक 1 मधून झालेल्या चुरशीच्या लढतीत तळेकर यांचा मंगेश गायकवाड यांच्याकाडून  45 मतांनी पराभव झाला आहे. सत्ता मात्र नव्याने निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपा पुरस्कृत जनशक्ती परिवर्तन पॅनेल ने 11पैकी 07 जागा जिंकून ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. तर महाविकास आघाडी ग्रामविकास पॅनलने 04 जागा जिंकल्या आहेत.

खरोखरच झालेला पराभव पचवून,हेवे-दावे विसरून मोठ्या मनाने सत्कार केल्याबद्दल सतिश यांनी दाखवलेल्या मोठ्या मनाचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध