Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

अहिल्यापुर येथे घरात घुसून तीन जणांना केली बेदम मारहाण..! तरुणीला पळविल्याच्या संशयातून..!



शिरपूर प्रतिनिधी:तरुणीला पळविल्याच्या संशयातून सहा जणांनी घरात घुसून तीन जणांना बेदम मारहाण केल्याचा घटना तालुक्यातील अहिल्यापुर येथे घडली आहे.याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यापुर येथील बाळासाहेब बिऱ्हाडे यांनी थाळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मिलिंद साहेबराव थोरात याच्या मुलीला बाळासाहेबांच्या मुलाने पळवून नेल्याच्या संशय घेवून मंगलाबाई थोरात,मिलिंद थोरात, राजेश थोरात,धनराज जावळे,उत्तम जावळे, सौ.शालू थोरात सर्व रा.अहिल्यापूर यांनी बि-हाडे यांच्या घरात घुसुन बाळासाहेब बिऱ्हाडे,लताबाई बिऱ्हाडे आणि मुलगी राजेश्वरी या तिघांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास एएसआय पारधी करीत आहेत.

⤵️
शिरपूर तालुक्यातील भटाने येथे चारित्र्याचा संशय घेत 20 वर्षीय विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण.पत्नीने पतीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे .


शिरपूर तालुक्यातील भटाने येथे चारित्र्याचा संशय घेत 20 वर्षीय विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण.पत्नीने पतीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
याप्रकरणी सरला मणीलाल भिल वय 20 रा.भटाने या विवाहितेने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पती मणीलाल भाईदास भिल रा.पुसनद ता.शहादा जि. नंदुरबार याने चारित्र्याचा संशय घेत घरातून मारहाण करीत माहेरी भटाने येथे पाठवून दिले.त्यानंतर भटाने येथे येत त्याने पुन्हा चारित्र्याचा संशयावरून शिवीगाळ व मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून सदर विवाहितेने पती मणीलाल भाईदास भिल रा.पुसनद ता.शहादा याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोना अनिल शिरसाठ करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध