Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २३ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
हिंदु हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सपन्न..!
हिंदु हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सपन्न..!
शिरपूर प्रतिनिधी:हिंदु हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर शहर शिवसेना युवसेना यांच्या माध्यमातून गोरगरीब गरजूंना मायेची उब मिळावी म्हणून शाल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता . या कार्यक्रमास धुळे जिल्हा संपर्क प्रमुख मा.बबनरावजी थोरात तसेच धुळे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अतुलभाऊ सोनवणे व धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हा प्रमुख हेमंतजी साळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक मा.हेमंतजी पाटील हे उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करुन माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस हेमंतजी पाटील यांच्या हस्ते पुष्पअर्पण करण्यात आले.तसेच यावेळी विविध क्षेत्रातील निवड झालेल्या खेळाडूंचे मा.पोलिस निरिक्षक साो हेमंतजी पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते धनराज राजपूत,पंकज बारी,रोहित धनगर,तसेच पीएचडी व गाईड शिप मिळणारे तलवारबाजीचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रताळे सर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत ,एस.टी.महामंडळ जिल्हाध्यक्ष राजु टेलर , उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा , विधान सभा क्षेत्र प्रमुख छोटूसिंग राजपूत , माजी धुळे जिल्हा उपप्रमुख हिम्मतराव महाजन,तालुका प्रमुख दिपक चोरमले , अत्तरसिंग पावरा,माजी उपतालुका प्रमुख राजेश गुजर,अभय भदाणे ,नन्ना जाधव , जितेंद्र पाटील,मसुद शेख,लक्ष्मण मराठे , गोलू माळी ,गोलू पाटील,आदेश ढिवरे , शाकीर कुरेशी , नितीन सोनार , राहुल सोनवणे ,इद्रिस शाह,वाजिद मलक , बंटी मराठे ,जिगर मराठे ,मयुर महाले ,तुषार महाले ,दिनेश गुरव,भुरा शिंपी,भावेश जैन , राहुल चौधरी या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शहरप्रमुख मनोज धनगर , शिवसेना शहर संघटक प्रेमकुमार चौधरी , शिवसेना उप शहर प्रमुख बंटी लांडगे , उपशहर प्रमुख योगेश ठाकरे ,सिध्दार्थ बैसाणे,युवा सेना शहर अधिकारी गोलू मराठे , युवा सेना शिरपूर शहर समन्वयक सचिन शिरसाठ या कार्यक्रमास सुत्रसंचालन प्रेमकुमार चौधरी यांनी केले,तर प्रास्ताविक भरतसिंग राजपूत,आभार मनोज धनगर यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा