Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

शिंदखेडा तालुक्यातील 48 ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आल्या यात 3 ग्रामपंचायत मधील 3 प्रभागात सारखे मते 5 वर्षीय मुलीने ईश्वर चिठ्ठी काढून उमेदवार झाले विजयी..!



शिंदखेडा तालुक्यातील 48 ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आल्या यात 3 ग्रामपंचायत मधील 3 प्रभागात सारखे मते मिळाल्याने सायली सुधीर शिंपी या 5 वर्षीय मुलीने ईश्वर चिठ्ठी काढून उमेदवार विजयी झाले.

यात सोनशेलू ग्रामपंचायतीचे उमेदवार कमलबाई नानाभाऊ गिरासे यांना 164 मते व रत्ना मनोहर म्हसदे यांना ही 164 मते मिळाल्याने दोघांना सारखे मते मिळाल्याने सायली शिंपी हीने इश्वर चिठ्ठीतून रत्ना म्हसदे यांची चिठ्ठी काढल्याने ते निवडून आल्या तसेंच सुराय -अक्लकोस गृप ग्रामपंचायतीच्या उमेदवार न्हानजी
ओंकार चव्हाण यांना 258 मते तर
भिमसिंह अंबरसिंह ठाकरे यांना ही 258 मते मिळाली दोघाही उमेदवारांना सारखे मते मिळाल्याने इश्वर चिठ्ठीत न्हानजी चव्हाण हे विजयी झाले.

नवे कोडदे ग्रामपंचायतीच्या निवडणूक ही पूनम प्रविण गिरासे यांना 87 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रमिला राजेंद्र रामराजे यांना 87 मते असे सारखे मते मिळाल्याने इश्वर चिठ्ठीतून पूनम गिरासे या विजयी झाले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध