Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १४ जानेवारी, २०२१
सिडकोत पत्रकाराला मनपाच्या अधिकाऱ्यांकडून मारहाण..!
नाशिक प्रतिनिधी:सिडको महानगर पालिकेच्या जलकुंभावर मद्यपान करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सिडकोतील एका पत्रकाराला मारहाण करून जखमी केले आहे. पाण्याच्या टाकीवर बसून मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी मद्यपान करीत असल्याने या पाण्याच्या टाकींची सुरक्षाच धोक्यात आल्याचे दिसत आहे. या प्रकरणी अंबड पोलीसांनी मनपाच्या अधिकाऱी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून तिघाजणांना अटक केली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सिडकोतील पत्रकार निशिकांत पाटील हे बुधवारी रात्री पाथर्डीफाट्याहून अंबड कडे जात होते. यावेळी पाथर्डी फाट्याजवळील मनपाच्या पाण्याच्या टाकीजवळ खुपच गोंधळ सुरु असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा काय प्रकार आहे ते पाहण्यासाठी पत्रकार पाटील गेले असता, त्यांना महानगर पालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे शैलेश झिटे,भावसार यांचेसह अन्य दोघेजण मद्यपान करीत असल्याचे दिसून आले. यावेळी पाटील यांनी त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता, या सर्वांनी पाटील यास तु फोओ का काढतोस, तु खुप मोठा पत्रकार आहेस काअसे म्हणून शिवीगाळ करून दमदाटी करून लाथ्याबुक्यांनी मारहाण केली.
हा प्रकार घडल्यानंतर पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेवून शैलेश झिटे, भावसार यांचेसह अन्य दोघांविरोधात तक्रार दिली. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून शैलेश रमेश झिटे (42 रा. सिडको), अक्षय दिपक निकम (24, अश्विननगर,), ज्ञानेश्वर सखाराम शिंदे (38, पाथर्डीफाटा) यांना अटक केली आहे. त्याचबरोबर यावेळी असलेले कनिष्ठ अभियंता ललित भावसार यांचा पोलीस तपास करीत असल्याचे पोलीसांनी सांगितले या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
सिडकोतील पाण्याच्या टाक्यांवर यापूर्वी सुद्धा अनेकवेळा मद्यपान करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातच या प्रकाराबद्दल आवाज उठविणाऱ्या पत्रकारांवरच अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी हल्ला करणे अत्यंत चुकीचे असून या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा