Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १४ जानेवारी, २०२१
कोरोना प्रतिबंध लस सुरक्षित असल्याने, भिती बाळगू नये-कौस्तुभ दिवेगावकर
उस्मानाबाद(राहूल शिंदे)दि.14 कोरोना लढ्याचा आज महत्वाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.जिल्ह्यासाठी 8 हजार 737 लसि उपलब्ध झाल्या आहेत. कोविन अॅपवर नोंदणी केलेल्या आठ 8737 जणांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रथम तीन केंद्रावर लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही कोरोना प्रतिबंधलस अत्यंत सुरक्षित असल्याने तिच्याबाबत भिती बाळगू नये,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज केले.
लातूर येथील आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयाकडून काल रात्री या लसीचा साठा उस्मानाबादमध्ये दाखल झाला आहे.त्यांची जि.प. च्या इमारतीत सध्या शासनाच्या निर्देशाचे पालन करून साठवणूक केली आहे.त्या ठिकाणी आज सकाळी जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली.
तेव्हा ते बोलत होते.यावेळी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, अपर जिल्हाधिकारी श्रीमती रूपाली डंबे-आवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ए.व्ही.वडगावे, जिल्हा लसीकरण तथा बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी आदी उपस्थित होते.
कोरोना आजाराने अनेक दिवसांपासून हैरान असलेल्या जनतेस केंद्र शासन व राज्य शासनाच्यावतीने काल दि 13 जानेवारी कोविडशिल्ड लस जिल्हास्तरावर प्राप्त झालेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून पूर्णपणे संपलेला नाही.जनतेने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यात मास्क वापरणे,सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सॅनिटाझरचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे या बाबी आवश्यक आहेत. कोविडशिल्ड लसीकरणामुळे जनतेत आंनदीमय वातावरण होईल,असा विश्वास कौस्तभ दिवेगावकर यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हास्तरावर पहिल्या टप्प्यात कोविडशिल्ड लस चे 10 हजार 50 डोस प्राप्त झाले आहेत. शासकीय व खाजगी संस्थेतील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणारआहे.यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.यामध्ये जिल्हा रूग्णालय, उस्मानाबाद.उपजिल्हा रुग्णालय,तुळजापूर. उपजिल्हा रुग्णालय,उमरगा येथे हे केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ दि.16 जानेवारी रोजी शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार करण्यात येणार आहे,अशी माहिती डॉ.वडगावे यांनी दिली आहे.यावेळी शरद मुंडे, व्ही.के.शेळगावकर (शितसाखळी तंत्रज्ञ),डी. सी.धोत्रे औषध निर्माण अधिकारी,अर्जुन लाकाळ जिल्हाविस्तार व माध्यम अधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...
-
बापू चव्हाण दिंडोरी क्रिशा फाऊंडेशन संचलित ज्ञानज्योती क्लासेस,किड्स टाऊन स्कूल आणि क्रिशा टेक्नो हबचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा