Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ११ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
पाडळसरे धरणासाठी १३५ कोटी निधी , भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांचे अमळनेर नगरीत जंगी स्वागत..!
पाडळसरे धरणासाठी १३५ कोटी निधी , भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांचे अमळनेर नगरीत जंगी स्वागत..!
अमळनेर नगरीचे हरितक्रांतीचे स्वप्न ज्या पाडळसरे धरणामुळे पुर्ण होणार आहे .त्यासाठी अमळनेरचे भूमिपुत्र अनिल दादा यांनी १३५ कोटी निधी खेचून आणल्याने अमळनेर नगरीच्या नागरिकांकडून जंगी स्वागत करण्यात आले.
पाडळसरे धरण समितीने त्यांचे अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वागत केले व नागरिकांकडून आभार मानलेत .
भूमिपुत्र अनिल पाटील यांनी सर्व नागरिकांनी, जो आदर सत्कार केला त्याबद्दल जनतेला नतमस्तक होवून आभार मानलेत .पाडळसरे धरण हे अमळनेर वासीयांचे स्वप्न असून माझे प्रथम कर्तव्य आहे .जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे गिरीश महाजन जलसंपदा मंत्री असताना देखील,पाडळसरे धरणाच्या कामाला गती मिळाली नाही.
आघाडी सरकारच्या कार्यकाळातील जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निवडणुकीच्या वेळी अमळनेरच्या (जनतेला) दिलेला शब्द खरा करून दाखविला.मंत्री महोदय यांनी सत्तेत आल्यानंतर पाडळसरे धरणाला भेट दिली व जनतेला आश्वासीत केले होते.त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण करून दाखविला .पाडळसरे धरणा बरोबरच अमळनेरच्या सर्वांगीण विकास करण्याचे दायित्व माझ्यावर आहे .
जनतेने मला भूमिपुत्र म्हणून जो मान - सन्मान दिला आहे.तो खरा करून दाखवून अमळनेर तालुका सुजलाम- सुफलाम करने हेच माझे ध्येय व कर्तव्य आहे असे त्यांनी जनतेला सांगितले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा