Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ मार्च, २०२१

मोटारसायकल चोरीतील आरोपी आंबी पोलिसांच्या ताब्यात....

आंबी (राहूल शिंदे) दि.23 बजाज डिस्कव्हर मोटारसायकल चोरीस गेल्यावरुन आंबी पो.ठा. गु.र.क्र. 09 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 दाखल झाला होता. पोलीस तपासा दरम्यान आरोपी- सुनिल सफ्या शिंदे उर्फ गुल्ल्या, वय 20 वर्षे, रा. पांढरेवाडी, ता. परंडा यास आंबी पो.ठा. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक- आशिष खांडेकर, पोहेकॉ- होडशीळ, पोना- सम्राट माने, संदीप चौगुले यांच्या पथकाने 23 मार्च रोजी मोटार सायकल सह आरोपी ताब्यात घेतला असून पुढील अधिक तपास करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध