Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ मार्च, २०२१

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १५ वा वर्धाप दिना निमित्ता आज भव्य रक्तदान शिबिर..!




शिरपुर प्रतिनिधी दिनांक ०९/०३/२०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १५ वा वर्धाप दिना निमित्ता आज भव्य रक्तदान शिबिर व पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला असून अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी नी रक्तदान करून सामाजिक बाधालकी डोळ्यासमोर ठेवून जनहित कार्य करण्याच्या एक यशाची प्रयत्न केला

यावेळी आदरणीय तहसीलदार साहेब आबा महाजन व सचिन शिंदे बालविकास प्रकल्प अधिकारी शिरपूर यांच्या हस्ते प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज पुष्प अर्पण करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन आबा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले ठिकाण निमझरी नाका हॉटेल मैफिल शिरपूर येथे संपन्न झाला असून तसेच स्वर्गवासी मुकेश भाई पटेल ब्लड बँक शिरपूर यांचे सहकार्य लाभले यावेळी ३८ कार्यकर्ते व पदाधिकारी रक्तदान केले तसेच जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचे आहे अशे स्वप्न व विचार जनतेला देणाऱ्या राजसाहेबांचे विचार घराघरात अगदी दुर्गम पाड्यात पोहचावे या हेतूने सांगवी गावातील अनेक युवकांनी राजसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मनसेत प्रवेश केला.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री ॲड. प्रसाद देशमुख, मनसेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष राकेश भाऊ चौधरी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे, मनसे शहराध्यक्ष चेतन राजपूत,मनसे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष छोटूभाऊ राजपूत,मनविसे शहराध्यक्ष सोनू राजपूत,मनविसे शहर उपाध्यक्ष राहुल शिराळे, मनसे तालुका उपाध्यक्ष अतुल बडगुजर,बाबु मुश्टा  मनविसे विखरण गट अध्यक्ष प्रशांत तिरमले, मनविसे तालुका सहसचिव राकेश पाटील, मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत राठोड, मनविसे तालुका सचिव शुभम शिरसाट, तालुका उपाध्यक्ष रमेश अहिरे, अविनाश मालचे, नरेश तिरमले, अमोल गुजर, महेंद्र तुंगार, महारु बागुल, हिरामण गायकवाड, मानस गायकवाड, प्रेमसिंग पावरा, शरद कोकणी, कृष्‍णा गवडे, आदर्श शिंदे, कमलेश थोरात, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

1 टिप्पणी:

प्रसिद्ध