Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ९ मार्च, २०२१

चिंचपूर (बु) येथे महिला दिना निमित्त स्वच्छता मोहीम...


परंडा (राहूल शिंदे) दि.9 तालुक्यातील चिंचपूर (बु) येथे ग्रामपंचायत,अंगणवाडी व जागृती फाऊंडेशनच्या वतीने जागतीक महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात सरपंच सौ.प्रियंका पोपट शिंदे यांच्या हस्ते विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

यावेळी ग्रामसेवक लोखंडे यांनी स्वच्छता व शासकीय योजनेविषयी मार्गदर्शन केले. जागृती फाऊंडेशनचे सचिव सिद्धार्थ सावंत यांनी महिला सक्षमीकरण,उद्योग-व्यवसाय याविषयी मार्गदर्शन केले.त्यानंतर अंगणवाडी सेविका कांचन शिंदे,बचतगट सी.आर.पी उषा सावंत,गट सदस्या साधना देवकर, सरपंच प्रियंका शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी स्वच्छता मोहीम राबवून ग्रामस्वच्छता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अंगणवाडी सेविका अशा कुलकर्णी,शारदा माने,अशाबाई अनभुले, तसेच इतर मदतनीस यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध