Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ९ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
आदर्श ग्रामसेवक के.आर.देसले यांचे प्रताप नगाव बु. व नगाव खु.येथील ग्रामसभा कोऱ्या
आदर्श ग्रामसेवक के.आर.देसले यांचे प्रताप नगाव बु. व नगाव खु.येथील ग्रामसभा कोऱ्या
तरुण गर्जना : ग्रामसेवक हा ग्रामीण विकासाचा कणा मानला जातो .ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे काम हे ग्रामसेवकाकडे आहे.ग्रामीण भागात आज विकासापेक्षा भ्रष्टाचाराचीच तळ-मूळ खोल पर्यंत रुजलेली आहेत असे या प्रकरणावरून उघड झाले आहे. आदर्श ग्रामसेवक के.आर.देसले यांनी नगाव बु. व नगाव खु. ता.अमळनेर येथील त्यांच्या कार्यकाळात ग्रामसभा व मासिकसभा घेतलेल्या नसल्याचे माहिती अधिकारात उघड झालेले आहे.
ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात ,ग्रामपंचायतीतील दस्तऐवजामध्ये फेरफार व ग्रामपंचायत कामकाजात अनियमितता असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिव कर्मचारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे अधिकार व कर्तव्य गटविकास अधिकारी यांचे आहेत.हे सर्व कामकाज प्रामाणिकपणे होत नसल्याने ग्रामसेवक अश्या प्रकारचे धाडस करतात.
ग्रा.पं.नगाव बु. व नगाव खु .येथील ग्रामपंचायतीना तात्कालीन वेळी ग्रामसेवक के आर.देसले कार्यरत होते.त्यांच्या कार्यकाळातील ग्रा.पं.नगाव बु.व नगाव खु. येथील माहिती अधिकारात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नगाव बु.येथील सन २०१० ते २०११ पर्यंतच्या ग्रामसभांचे प्रोसिडिंग उपलब्ध झालेले नाही.तसेच ग्रा.पं.नगाव खु.येथील सन २०१० ते २०१२ पर्यंतच्या ग्रामसभांचे प्रोसिडिंग इतिवृत्त देखील उपलब्ध झालेले नाही .
तात्कालीन वेळी नगाव बु व नगाव खु. येथील प्राप्त ग्रा.पं.निधी ,ग्रामनिधी .पा.पु.योजना ,१३ वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त निधी तसेच इतर शासकीय योजनांद्वारे प्राप्त निधी खर्च करतांना ,शासन नियमानुसार ग्रामसभांची मंजुरी घेणे क्रमप्राप्त व अत्यावश्यक असतांना सदर योजनांअंतर्गत प्राप्त निधींचा खर्च करतांना ग्रामसभांची कुठलीही मंजुरी न घेता ग्रामपंचायत सदस्य यांना खर्चाची माहिती न देता सदर निधीचा (अनुदानाचा) बेकायदेशीररित्या सरार्स परस्पर खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व कामकाजावरून ग्रामसेवक के.आर.देसले यांनी आर्थिक व्यवहारात गैरकारभार व निधीचा अपहार केलेल्या असल्याचे तक्रारदार यांनी म्हटले आहे.
सन २०१० पासून २०१४ पर्यंत या कालावधीत मिळालेल्या माहिती वरून ग्रा.पं.नगाव बु.व नगाव खु ता.अमळनेर येथील उपलब्ध ग्रामसभा व मासिकसभा प्रोसिडिंग बुकातील इतिवृतांचे ,सदर प्रोसिडिंग बुकांमध्ये ग्रामस्थांच्या व ग्रा.पं.सदस्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत परंतु सदर सभांचे प्रत्यक्षात कामकाज न करता प्रोसिडिंग बुकांतील पेज-पाने कोऱ्या स्थितीत आढळून आले आहेत.
ग्रामसेवक कैलास रामभाऊ देसले यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आलेला आहे.आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकाचे अश्या प्रकारचे शासकीय कामकाज हे निश्चितच शासनाच्या पुरस्कार वितरण प्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारे आहे. के.आर.देसले यांचा ग्रा.पं.नगाव बु. , नगाव खु या ग्रामपंचायतीत शासकीय कामांत केलेला हलगर्जीपणामुळे व अर्थपूर्ण बेकायदेशीर व्यवहार लक्षात घेता त्यांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार त्वरित व तात्काळ काढून घेण्याची देखील मागणी करण्यात आली आहे .
ग्रामसेवक के.आर.देसले हे शासकीय सेवेत रुजू झाल्या पासून त्यांनी चोपडा तालुक्यातील ग्रा.पं.कठोरा,ग्रा.पं.संपुला अमळनेर तालुक्यातील ग्रा.पं.देवगाव –देवळी , ग्रा.पं.नगाव बु. ,नगाव खु अतिरिक्त ग्रा.पं.दहिवद , ग्रा.पं.मारवड यावल तालुक्यातील ग्रा.पं.न्हावी येथे कामकाज केले आहे.आता अमळनेर तालुक्यातील ग्रा.पं.जानवे येथे ते कार्यरत आहेत .या सर्व ग्रामपंचायतीनची खाते निहाय चौकशी करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे पंकज पाटील यांनी केली आहे.
ग्रामसेवक के आर.देसले यांनी शासकीय नियमांची पायमल्ली करत ग्रा.पं.नगाव बु. , नगाव खु येथील कामकाजात जाणीवपूर्वक व अर्थपूर्ण दुर्लक्ष केले असल्याने त्यांच्यावर शासकीय कामांत हलगर्जीपणा ,हयगय व कर्तव्यात कसूर केल्याकारणाने प्रचलित शासन नियमानुसार प्रथम शिस्तभंग विषयक कारवाई विनाविलंब करण्यांत यावी. ग्रामसभा न घेणे व ग्राम सभेला न विचारता निधी खर्च करणे हा कायद्या नुसार गुन्हा असून त्याकारणावरून ग्रामसेवक बडतर्फ होतो अशी कायद्यात तरतूद आहे .
ग्रा.पं.नगाव बु. ,नगाव खु येथील ग्रामपंचायतीत ग्रामसभा ,मासिकसभा न घेणे या कारणे व ग्रामसभेला न विचारता निधी खर्च केल्याने ग्रामसेवक या पदावरून के आर.देसले यांना शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फे करण्यात यावे अशी तक्रारार गटविकास अधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव ,जिल्हाधिकारी,आयुक्त नाशिक ,प्रधान सचिव व ग्रामविकास मंत्री यांच्याकडे अमळनेर तालुक्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी केली आहे.
“ग्रामविकासाची धुरा हि ग्रामसेवकांवर असतांना ग्रामविकास बाजूला सारत स्वतःचा विकास करण्यातच ग्रामसेवक धन्य असल्याचे या प्रकरणावरून लक्षात आले आहे .यापुढे अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांच्या कामकाजावर माझी नजर असणार आहे – पंकज पाटील “
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा