Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ एप्रिल, २०२१
Home
/
Unlabelled
/
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती कापडणे येथे साध्या पद्धतीने साजरा...!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती कापडणे येथे साध्या पद्धतीने साजरा...!
प्रचंड बुद्धीमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे ,महाड सत्याग्रह ,मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह ,शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्यलढ्यात सहभाग, कामगार नेते, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या अशा या महामानवाचा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज छोटेखानी जयंती सोहळा संपन्न झाला....
Covid-19 मुळे प्रत्येक गावात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्या कारणाने प्रत्येकाने covid-19 चे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. व या नियमांचे पालन करीत कापडणे येथील भीम गर्जना मित्र मंडळामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सकाळी सामुदायिक त्रिसरण पंचशील व बुद्धवंदना ग्रहण करण्यात आली. सामाजिक अंतर ठेवीत उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सोबत छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले, विर एकलव्य व तथागत गौतम बुद्ध यांच्या देखील प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व तलाठी मनोहर पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कापडणे गावातील प्रथम नागरिक सोनीबाई भील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र उर्फ बालू नाना पाटील, माझी पंचायत समिती सदस्य नवल आण्णा पाटील, शरद माळी. ग्रामपंचायत सदस्य अलकाबाई भामरे, हिम्मत दादा चौधरी ,हरीश पाटील, प्रवीण पाटील, महेश माळी ,जितू भिल ,महेश पाटील, नीलेश जैन, अक्काबाई भिल, सामाजिक कार्यकर्ते अंजन पाटील प्रमोद दादा पाटील प्राध्यापक दिनकर माळी काशिनाथ भील, प्रा.विश्वासराव देसले सर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा