Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

नळदुर्ग शहरात विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी..!



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत नळदुर्ग शहरात विविध ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 
   
नळदुर्ग शहरातील भीम नगर येथील बौद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संजय वेदपाठक, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, भाजपचे शहर सरचिटणीस पत्रकार विशाल डुकरे, आशिष लोंढे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी सम्राट ग्रुपचे अध्यक्ष पप्पू सुरवसे, बापू दुरुगकर,  योगेश सुरवसे, पिंटू बनसोडे,किशोर बनसोडे, उमेश गायकवाड, भाजप युवा वारीयर्स चे शहर उपाध्यक्ष अक्षय सुरवसे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध