Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

ब्रेकिंग : अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा



मुंबई : अखेर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण

मुंबईचे माजी पोलीस आयुक्‍त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍यावर केलेल्‍या आरोपांची सीबीआयने प्राथमिक चौकशी करावी, असा आदेश आज मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिले. या प्रकरणाची चौकशी पूर्ण करुन १५ दिवसांमध्‍ये अहवाल सादर करावा, असा आदेशही न्‍यायालयाने दिला. परमबीर सिंग यांची याचिका निकाली काढताना, त्‍यांनी पोलिस बदल्‍यासंदर्भात केलेल्‍या तक्रारी संबंधित यंत्रणेसमोर मांडाव्‍यात, असेही न्‍यायालयाने सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्‍येक महिन्‍याला १०० कोटी रुपये वसूल करण्‍याचे टार्गेट दिले होते. पोलिस नियुक्‍ती व बदल्‍यांसाठी गृहमंत्री देशमुख पैशांची मागणी करत. तसेच तपास कार्यातही हस्‍तक्षेप करतात, असे आरोप परमबीर सिंग यांनी मुख्‍यमंत्री उद्‍धव ठाकरे यांनी लिहिलेल्‍या पत्रात केले होते. या सर्व आरोपांची सीबीआय चौकशी व्‍हावी, अशी मागणी परमबीर सिंग यांच्‍यासह वकील जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्‍या याचिकेमधून करण्‍यात आली होती.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध