Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ६ एप्रिल, २०२१
पत्रकार बांधवांना निःशुल्क कोरोना प्रतिबंध लस द्यावी..!
जिल्ह्यात ICU,बेड व व्हेंटिलेटर
संख्या तात्काळ वाढविण्यासंदर्भात केंद्रीय पत्रकार संघाची जिल्हाधिकारी निवेदनातून मागणी
धुळे-कोरानाच्या संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी डॉक्टर्स , नसेंस , पोलिस यांच्या प्रमाणेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखल्या जाणा - या पत्रकारांनीही रस्त्यावर उतरुन सर्वात पुढे राहुन लोकसेवा केली आहे . या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पत्रकारांना तात्काळ निःशुल्क कोरोना लस दयावी. तसेच निशुल्क आरोग्य सोयी सुविधा पुरवाव्यात'जिल्ह्यात
जिल्ह्यात ICU,बेड व व्हेंटिलेटर वाढवावे यामागणीचे निवेदन आज धुळे जिल्हा केंद्रीय पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोविड -१ ९ संक्रमणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत . त्यात ऑक्सिजनची, व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे . परंतु जिल्ह्यातील वाढती कोविड -१ ९ रुग्णसंख्या बघता ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर जिल्हा रुग्णालय व मनपा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
या कारणामुळे अनेक रुग्णांना जिल्ह्याबाहेर उपचारासाठी जावे लागत आहे ; परंतु गरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अशा रुग्णांना धुळे जिल्हा रुग्णालयाशिवाय पर्याय नाही . असे अनेक कोरोना संसर्ग रुग्णांना जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून , वेळप्रसंगी जीव गमवावा लागत आहे..
तर कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्यामुळे जिल्ह्यात रेमडेशिवीर इंजेक्शन औषधाचा पुरवठा वाढवावा.व जादा दराने औषधांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे जिल्हयातील पत्रकारांच्या या मागणीचा प्रस्ताव राज्यशासनाला पाठवावा अशी मागणीही करण्यात आली आहे..
निवेदनदेते वेळी केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख दिपक वाघ, ज्येष्ठ पत्रकार यशवंत हारणे, केंद्रिय पत्रकार संघाचे शहराध्यक्ष पवन मराठे, महासचिव गणेश पवार, केंद्रीय पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुनील निकम, व जिल्हा सचिव रोशन खैरनार आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा