Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ एप्रिल, २०२१
Home
/
Unlabelled
/
दोंडाईचा शहरातील रेमडीसिवर चा काळाबाजार मनसे विध्यार्थ्यी सेनेचे कार्यकर्त्यांच्या चव्हाट्यावर
दोंडाईचा शहरातील रेमडीसिवर चा काळाबाजार मनसे विध्यार्थ्यी सेनेचे कार्यकर्त्यांच्या चव्हाट्यावर
दोंडाईचा प्रतिनिधशिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात रेमडीसिवर इंजेक्शनाचा काळाबाजार होत असून मनसे विध्यार्थ्यी सेनेच्या कार्यकर्त्यांच्या चव्हाट्यावर आला एका महीलेला कोरोनाची लागन झालेली होती त्या महीलेला अर्जंट रेमडीसिवर इंजेक्शन लागणार होते दोंडाईचा येथील खान्देश मेडिकल एजन्सी चे मालकाचा मुलगा आशिष नावाचा तरूणा कडे रेमडीसिवर इंजेक्शन आहेत असे मनसे विध्यार्थी सेनेचे शिंदखेडा तालुका संघटक दिग्विजयसिंग राजपुत यांना कळाले त्यांनी लगेच आशीष यांना फोन केला त्यांनी लगेच काही वेळात रेमडीसिवर घेण्यासाठी दोंडाईचा येथील व्यापारी भवन जवळ बोलवून दोन इंजेक्शन वाढीव किंमती मध्ये दिले दिग्विजयसिंग राजपुत यांनी पोलीस मित्र संघटनेचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष प्रशांत गिरासे यांना संपूर्ण प्रकार सांगितला व यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी मनविसे शिंदखेडा तालुका यांनी केली.
त्यानंतर पोलीस मित्र संघटनेचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष प्रशांत गिरासे यांनी रेमडीसिवर इंजेक्शनाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच खान्देश मेडिकल एजन्सी दोंडाईचा यांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्हाधिकारी साहेब व अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे यांच्या कडे केली रेमडीसिवर चा काळाबाजार करणाऱ्या वर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा न्यायासाठी नियमानुसार आंदोलन छेदण्यात येईल असा इशारा प्रशांत गिरासे यांनी दिला आम्हांला ब्लॅक मध्ये रेमडीसिवर इंजेक्शन देऊन आमची फसवणूक करण्यात आली आहे अशी आज पर्यंत किती लोकांची फसवणूक या व्यक्ती ने केली असेल असा प्रश्न जनतेच्या चर्चेत सुरू आहे.
धुळे, नंदुरबार, शिरपुर या शहरात कोरोनाच्या रूग्णांना योग्य वेळी रेमडीसिवर इंजेक्शन दिले जात आहे पंरतु दोंडाईचा शहरात रूग्णांना इंजेक्शन मिळत नाही योग्य तो उपचार नाही यामुळेच अनेक रूग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे आणि आजून कित्येक लोकांचे बळी घेतले जातील असा प्रश्न मनसे विध्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे तरी सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्यांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा