Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

नाशिक सिडको परिसरातील खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत न झाल्यास सिडको परिसरातील खाजगी कोविड रुग्णालय बंद करणार




सिडको प्रतिनिधी : सिडको परिसरातील खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन साठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे पुढील दोन दिवसांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत न झाल्यास सिडको परिसरातील दोन ते तीन खाजगी कोविड रुग्णालय बंद करणार असल्याचा पवित्रा कल्पतरू हॉस्पिटल चे संचालक व भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ वैभव महाले यांनी घेतला आहे.

सिडको परिसरातील काही दिवसापासून खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून वारंवार मागणी करूनही ऑक्सीजन सिलेंडर मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे बुधवार दिनांक 21 पासून ऑक्सिजनचा पुरवठा होऊ न शकल्याने सिडकोतील अनेक रुग्णांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

पुढील दोन दिवसात ऑक्सिजन न मिळाल्यास नाईलाजास्तव सिडकोतील काही खासगी रुग्णालय असलेले कोवीळ सेंटर बंद करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घ्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याकरिता संबंधित प्रशासनाने खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी अपेक्षा डॉक्टर वर्ग करीत असल्याचे मत डॉक्टर वैभव महाले यांनी व्यक्त केले.


प्रतिक्रिया
मागील काही दिवसापासून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी खाजगी रुग्णालयांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला असून बुधवारी ऑक्सिजन अभावी आम्हाला रुग्णांना इतरत्र हलविण्याचा सल्ला रुग्णांच्या नातेवाईकांना दिला असून पुढील दोन दिवसात परिस्थिती न निवडल्यास आम्हाला नाइलाजास्तव कोवीळ रुग्णालय बंद करण्याची वेळ येऊ शकते म्हणून संबंधित प्रशासनाने त्वरित ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा

डॉ वैभव महाले
संचालक कल्पतरू रुग्णालय



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध