Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० एप्रिल, २०२१
Home
/
Unlabelled
/
योगेश चौधरी व त्याचे सहकारी मिञ यांच्या पाठपुरावाला यश..! बुराई नदीवरील कठडे दुरुस्तीला सुरुवात..!
योगेश चौधरी व त्याचे सहकारी मिञ यांच्या पाठपुरावाला यश..! बुराई नदीवरील कठडे दुरुस्तीला सुरुवात..!
शिंदखेडा प्रतिनिधी: येथील शिंदखेडा ते शिरपूर राज्य महामार्गावरील बुराई नदी पुलाचे तुटलेल्या कठडे दुरुस्त करण्यासंदर्भात योगेश चौधरी, जीवन देशमुख, चंद्रकांत माळी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता शामकांत भोसले व शिंदखेडा उपविभागीय अभियंता एम.आर.पवार यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठडे दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. आज दि. 19 पासून कठडे दुरुस्त करण्याचा कामास सुरुवात केली आहे.
शिंदखेडा ते शिरपूर राज्य महामार्गावर मागील 4 महिन्यापूर्वी पुलावरून माल वाहतूक ट्रक खाली कोसळला होता. त्यात पुलाचे कठडे तुटले होते. सदर पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत.
असून शाळकरी मुले, नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. कठडे अभावी अपघाताची भीती व्यक्त होत होती. या संदर्भात योगेश चौधरी, जीवन देशमुख, चंद्रकांत माळी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. याची दखल घेत साबांविभागाने पुलावरील कठडे दुरुस्तीला सुरुवात केली आहे. होत असलेल्या कठडे दुरुस्तीचे नागरिकांना समाधान व्यक्त केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा