Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

धनुर लोनकुटे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात विश्वरत्न डॉ.आंबेडकर यांना अभिवादन...!



धनुर प्रतिनिधी-:धुळे तालुक्यातील धनुर लोनकुटे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महामानवास प्रतिमा पुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले या वेळी धनुर लोनकुटे ग्रुप ग्रामपंचायती च्या प्रथम लोकनियुक्त सरपंच माईसाहेब सौ.सत्यभामाबाई रोहिदास  शिंदे, प्रविण पाटील ( जिल्हाध्यक्ष,मराठा सेवा संघ प्रणित,क्रुषी परिषद ,धुळे ) यांनी ,डॉ. आंबेडकर यांचे देशाप्रती असलेल्या योगदाना बद्दल मनोगत वेक्त केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पत्रकारीता अस्या अनेक क्षेत्रातील गहन चिकित्सक होते. ते एक जागतिक दर्जाचे महान तत्वज्ञ होते.असाही उल्लेख त्यांनी केला. भारतीय राज्य घटना लिहतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. कि,"मला घटना लिहतांना जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. 

कारण माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा इतिहास होता "हा बाबासाहेब यांच्या विधानाचा द्रुष्टांत देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून छत्रपती शिवरायांच्या कार्याचा झालेला गौरवाचे वर्णन त्यांनी केले.डॉ. आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित धनुर/लोणकुटे चे प्रथम  लोकनियुक्त सरपंच माईसाहेब  सौ.सत्यभामाबाई रोहिदास शिंदे, माजी उपसरपंच श्री. युवराज चौधरी सर,ग्रामसेवक अभय चौधरी, ग्रा.पं.कर्मचारी श्री. राजेंद्र वाघ, राव कोळी, सुरेश वाघ, तर ग्रामस्थांपैकी श्री. शांतीलालभाई पटेल,  देवीदास शिंदे,अरूणदादा शिंदे,संदेश पाटील, मोहन सुर्यवंशी आदी उपस्थित होते...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध