Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ एप्रिल, २०२१
डॉक्टर आणि कोरोना..!
सध्याची परिस्थिती बघता डॉक्टर देवदूत असल्यासारखे वाटतायं. वाटतात कसले आहेतच.दिवसरात्र रुग्णांना सेवा देणारा डॉक्टर आणि सेवा देत असताना स्वतः positive होताय.शहरापेक्षा खेड्यातील परिस्थिती खूप वाईट आहे.डॉक्टर आहेत खेड्यावर पण कसे आणि कुठली डिग्री घेतलेले हे त्या बिचाऱ्या खेड्यातील लोकांना माहीत ही नसते.
हे डॉक्टर खेड्यातील लोकांची अतिशय चलाखीने फसवणूक करतात.आधी कुठल्यातरी मोठ्या hospital मध्ये कंपाऊंडर म्हणून काम करतात मग काय थोडाफार अनुभव गाठीशी बांधला की येतात खेड्यात अशिक्षित लोकांना फसावायला.फसवणूक म्हणजे कुठल्यातरी strong औषधी दिल्या तर patient लवकर बरा होतोच.अशक्त झाला की सलाईन लावायची पेशंट बरा आणि डॉक्टर चांगला म्हणायला फारसा वेळ लागत नाही.पण तो ज्यावेळी strong औषधी देतो त्यावेळी त्या पेशंटला खरचं त्याची गरज असते का? तो पेशंट त्यावेळी अगदी लगेच बरा तर होतो पण त्याच्या शरीरात जाणाऱ्या त्या हेही औषधीच्या डोसने वाईट परिणाम पण होऊ शकतो ना? तो लगेच नाही पण कालांतराने दिसतो त्याचा विचार ना डॉक्टर करतो ना पेशंट.याउलट डिग्री घेऊन practice करणारा डॉक्टर पेशंट आला की नीट तपासेल आवश्यक असेल तर injection आणि औषधे देतो.आता हा पेशंट पण बरा होतोच पण फक्त दोन दिवसानंतर कुठल्याही side effect शिवाय.आता सध्याची परिस्थिती खूप नाजूक आणि त्यापेक्षाही खूप वाईट आहे.
म्हणून मग जर उपचार शक्य असेल तर करावा.नाहीतर मग पेशंट लवकरात लवकर शहरी भागात पाठवावा पण खेड्यातील डॉक्टर ४-५ दिवस त्या पेशंटला कुठलीही रक्ततपासणी शिवाय गावातच ट्रीटमेंट करतात स्वतःचा जो फायदा करायचा तो करतात आणि मग त्याला मोठ्या हॉस्पिटल ला पाठवतात तोवर वेळ बरीच पुढे निघून गेलेली असते.पेशंट तिथल्या ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाही आणि मग देवाघरचा रस्ता...
मी पण एक डॉक्टर ची पत्नी...माझा नवरा गेले १७-१८ वर्ष एका खेड्यात practice करतोय.पण मला अभिमान वाटतो त्यांचा कारण १७-१८ वर्षात एकही व्यक्तीला त्यांच्यामुळे जीव गमवावा लागला नाही आणि निव्वळ पैसे कमावणे हा उद्देश कधीच त्यांनी ठेवला नाही.पैसे कमवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणे कधी आम्हाला जमले नाही.कारण डॉक्टरला देव जरी म्हणत असतील लोक तरी त्यालाही कधीतरी खऱ्या देवाला सामोरे जावेच लागते.त्यावेळी असं नको व्हायला एक देव दुसऱ्या देवासमोर मान खाली घालून उभा राहतोय.
परिस्थिती खूप वाईट आहे.सध्या मोबाईल मुळे बरीच माहिती घरीच कळते.गाफील न राहता लवकर टेस्ट करा आणि लवकर इलाज करून लवकर बरे व्हा.डॉक्टर शिवाय पर्याय कुठेच नाही आणि कधीच नाही फक्त डॉक्टर कसा आणि कुठला निवडायचा हे शिका योग्य सल्ला घ्या आणि सावध रहा.आपली कुणी फसवणूक करत नाही ना याची जाणीव ठेवा.थोडा अविश्वास दाखवला तरी चालेल पण डॉक्टरला सगळी माहिती विचारा आणि तुम्हाला काय होत आहे ते पण सांगा होणारा त्रास कोरोनाच्या भीतीने लपवू नका.शेवटी एकच विनंती तुमच्या स्वतः साठी योग्य डॉक्टर निवडायला शिका...
लेखन...
सौ.सोनाली शरद पाटील...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी दि. १ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारात प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल...
-
जिल्हा परिषदेला वाळवी प्रमाणे पोखरणाऱ्या बांधकाम विभागातील वाघचा गळ्याचा ताईत असलेला कुणाल नेरकर हा ठेकेदार, जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा