Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

जातोडा आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण चालू करा - बोरगावच्या उपसरपंचांची मागणी



जातोडा येथे आरोग्य उपकेंद्र नावालाच आहे की काय अशी शंका परिसरातील नागरिक करीत आहेत. तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. प्रशासन म्हणते कोरोनाची लस घ्या तसेच घरा बाहेर पडू नका असेही सांगते आता लोकांनी करावे काय?

परिसरातील लोक सांगावी/वाडी येथील आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी जात आहेत. ज्याच्या कडे जाण्यासाठी साधन नाही त्यांनी कसे जावे?  

म्हणूनच जातोडा आरोग्य उपकेंद्रात लवकरात लवकर कोरोना लसीकरण चालू करावे जेणेकरून परिसरातील लोकांना कोरोना काळात लांब बाहेर गावी न जाता परीसरातच लस घेता येईल व कोरोना चा संभाव्य धोका टाळता येईल तशी मागणी परिसरातील बोरगाव येथील उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध