Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

डॉ.युवराज साळवे यांची कन्नड तालुका आरोग्य संपर्क प्रमुख पदी नियुक्ती....


औरंगाबाद(राहुल शिंदे) दि.6 कन्नड येथील डॉ.युवराज साळवे यांची विश्व जन आरोग्य सेवा समिती मार्फत ''कन्नड तालुका आरोग्य संपर्क प्रमुख'' पदावर संस्थापक अध्यक्षा सौ.छायाताई भगत,सचिव श्री.प्रशांतदादा भोसले, प्रदेश सल्लागार श्री.निलेशदादा साठे, प्रदेश संपर्क प्रमुख श्री.रविंद्रदादा पाटील यांनी डॉ.युवराज साळवे यांची सामजिक कार्याची दखल घेऊन निवड केली आहे व तसे नियुक्तीपत्र दिलेले आहे.

आपण विश्व जन आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा आणि वारसा समितीचे नियम आणि सर्व बंधने पाळून चांगल्या प्रकारे मानवतेचे कार्य करून रुग्णांचा आधार व्हाल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या निवडीबद्दल विश्व जन आरोग्य सेवा समितीचे औरंगाबाद जिल्हा समन्वयक योगेश काळे,कन्नड तालुका आरोग्य समन्वयक डॉ.बाळू साळवे यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध