Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ८ मे, २०२१
चंदनपुरी घाटत आयशर टेम्पो पलटी,एक ठार...
संगमनेर(अंबादास सांगळे)दि.8 तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात टोंमॅटो घेऊन जात असणारा आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात घडला आहे.
या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. हा आयशर टेम्पो पलटी झाल्याने टेम्पोतील टोंमॅटोचा सडा रस्त्यावर पडला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, टोंमॅटो घेऊन जाणारा आयशर टेम्पो पुण्याहून आळे फाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात असताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाट परिसरात आला असता टेम्पो महामार्गावर पलटी झाला. टेम्पोमधील टोंमॅटोचे भरलेले क्यारेट महामार्गावर अस्ताव्यस्त होऊन टोंमॅटोचा सडा पडलेला होता. या टेम्पोखाली एक जण अडकलेला होता. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती मिळताच डोळसणे महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस अरविंद गिरी, कैलास ठोंबरे, संजय मंडलिक यांनी घटनास्थळी धाव घेतली रस्त्याची वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा